‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय करते माहितेय? जाणून थक्क व्हाल!
सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे देशात अनेक चाहते असतात. महाराष्ट्र मध्ये तर मराठी मालिका सिनेमे मध्ये काम करणाऱ्या अभिनेते अभिनेत्री यांचे लाखो चाहते आहेत. तर ते नेमकं काय करतात ? कसे जगतात ? अश्या अनेक गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
माझ्या नवऱ्याची बायको’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील राधिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेत आपल्याला अनिता दातेला पाहायला मिळाले होते. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. ही मालिका संपल्यानंतर तुमची लाडकी अनिता आता काय करतेय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
कारण अभिनेत्री सध्या कुठेतरी आहे जिथं आहे तिथं एन्जॉय करत आहे. पण ते जाणून घ्यावे लागेलच कारण. सोशल मीडियावर खूप फोटो व्हायरल होत आहेत.
अनिता ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या चित्रीकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून चांगलीच बिझी होती. पण आता ती वेळ काढून तिचा पती आणि मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. तिनेच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. अनिताने पती चिन्मय, तिची मैत्रीण अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेत्री स्नेहा माजगांवकर यांचे फोटो शेअर करत या ट्रीपविषयी सांगितले आहे.
तिने माझ्या नवऱ्याची बायको मध्ये सलग खूप काम केलेले आहे. आणि तिला या 5 वर्षांच्या दरम्यान वेळ ही मिळाला नाही. त्यामुळे ती आता थोडं मोकळं ठेवत आहे. जे खूप गरजेचं आहे.
आणिताने सोशल मीडियावर केलेल्या तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, फिरायाला जाऊया कुठे तरी …. पण कुठे? असा प्रश्न नेहमीच पडतो. आम्ही घरात दोन माणसं. मी आणि माझा नवरा चिन्मय . आम्हा दोघांच्याही आवडी-निवडी भिन्न आहेत. फिरायला जाण्याच्या संदर्भात आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. तरी या वेळी आम्ही तो घाट घातलाच. दोन दिवस सावंतवाडी.. समुद्र आणि तीन दिवस जंगल फिरणे असे ठरले.
पक्षी, प्राणी, फुलं, फुलपाखरं, डोंगर, जंगल या सगळ्याकडे कसं बघायचं? कसं फिरायच? त्या साठी त्या प्रत्येक घटकाकडे बघण्याची वेगळी दृष्टी असावी लागते. माझ्यात ती नाही. ती चिन्मयमध्ये आहे. तो त्यात अधिक रमतो. मला काही बेसिक पक्षी ओळखता येतात. पक्ष्यांचे आवाज कळत नाहीत. चिमणी चिव चिव कावळा कावं काव.. साळुंकीची बडबड.
कबुतरांचे आवाज आणि अजून दोन चार पक्षी न त्यांचे आवाज माहिती आहेत. पण चिन्मयमुळे मला आता रस निर्माण होतोय. त्याने मागे लागून… आग्रही भूमिका घेऊन ही ट्रीप करवून आणली म्हणून हे घडतंय. या पाच दिवसात आम्ही खूप फिरलो… बीच, जंगल, नदीकाठ, देवराई, वेगळे वेगळे प्राणी बघितले… पक्षी ओळखायला शिकलो… खूप मासे खाल्ले… अस्सल कोकणी जेवण केलं… मौज आली…
आमच्या ट्रीपमध्ये आमच्या दोन मैत्रिणी स्नेहा माजगांवकर आणि पल्लवी पाटील सोबत होत्या मग तर आणखी मज्जा… पण या ट्रीप मध्ये निसर्गाची खरी शाळा भरली ती वनोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये. ज्या तरुणाने हे उभारलं आहे, तो प्रवीण देसाई आणि त्याचा सहकारी विशाल आमचे मित्र झाले. त्यांनी सोप्प्या पद्धतीने आम्हाला गोष्टी बघायला शिकवल्या… दाखवल्या…
तर अश्या प्रकारे अनिता शूट नसताना आता स्वतःच्या जीवाला निवांत पणाच सुख देत आहे. तिला तिच्या प्रवासाठी खूप खूप शुभेच्छा ! पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.