लग्न केल्यानंतर सुद्धा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला आई न होण्याचा निर्णय? कारण ऐकून थक्क व्हाल!

.

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये काही अभिनेत्री अश्या होऊन गेल्या आहेत की आजही त्यांचे चित्रपट रसिक आवर्जून पाहत असतात. १९७० नंतरचा काळ अनेक अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या बळावर गाजवलेला आहे.

त्यात एक अभिनेत्री अशी आली की व्हिलन म्हणून तिला पडद्यावर पाहायला प्रेक्षक तरसू लागले. तिचे चित्रपट कधी येतील याची वाट पाहू लागले. त्या अभिनेत्रीचं नाव आहे अरुणा इराणी. अरुणा इराणी ने आजवर कित्येक चित्रपटामध्ये अजरामर असा अभिनय केलेला आहे.

हिंदी चित्रपटात खास करून आपल्याला हिरो हिरोईन पडद्यावर अभिनयाची जुगलबंदी करताना दिसतात. आपण ही ते खूप मन लावून पाहत असतो. आपल्या डोक्यात हिरो हिरोईनचं बसतात. पण व्हिलन नसतील तर चित्रपटामध्ये काही अर्थ शिल्लक राहत नाही.

अरुणा इराणी यांनी हिरो चित्रपटात जर व्हिलन भूमिका नसती साकारली तर आज आपल्याला तो चित्रपट नसता आवडला. कारण पडद्यावर सुद्धा नाण्यांच्या दोन्ही बाजू दाखवाव्या लागतात. अरुणा इराणी यांनी त्यांच्या काळात सगळ्या भूमिका खूप उत्तम प्रकारे साकारल्या आहेत.

१८ ऑगस्ट ला त्यांचा वाढदिवस असतो. आज त्या 74 वर्षांच्या झालेल्या आहेत. पण कामाची झलक अजूनही तशीच आहे. २००० हजार नंतर जरी आपण त्यांना पडद्यावर फार काळ पाहिलं नसलं तरी आजही अरुणा इराणी यांनी अभिनय करून ठेवलेल्या फिल्म ला तेवढीच लोकं पसंती देतात.

अरुणा इराणी यांचा जन्म मुंबईत १८ ऑगस्ट १९४६ ला झाला. ते त्यांच्या सर्व आठ भाऊ बहिणीमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणी लहान भाऊ बहिणींना सांभाळायची मोठी जवाबदारी होती. अरुणा इराणी यांनी शिक्षण फार लवकर सोडलं. त्यांनी सहावी नानात्र शिक्षण सोडून दिलं.

पण अभिनय लहानपणापासुनच त्यांच्या मना मनात घर करीत होता. त्यांनी शिक्षण यामुळे सोडल की सगळ्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या घरी फार पैसे नव्हते. त्यामुळे अरुणा इराणीने शिक्षण सोडून लहान बहु बहिणींना शिकवण्याची जवाबदारी हाती घेतली. यातच त्यांच्या अभिनयाची झलक या ना त्या मार्गाने लहानपणी निघतच होती. त्यांनी बॉलीवूड मध्ये १९६१ साली गंगा जमुना या चित्रपटातुन अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अरुणा इराणी यांचं वय फक्त १५ वर्षं होतं.

१९६१ ला वयाच्या पंधराव्या वर्षी सुरु झालेला प्रवास आज हिंदी, गुजराती अश्या सर्व चित्रपट मध्ये त्यांचा ३०० च्या पुढे अभिनय प्रवास पोहचला आहे. ज्यामध्ये अनपढ, ह्मजोली, देवी, नया जमाना, फर्ज, बॉबी, सरगम, रॉकी, फकीरा, हिरो, लव्हस्टोरी आणि बेटा सारख्या अनेक नामंकित चित्रपट आहेत. १९८४ साली आलेली फिल्म पेट, प्यार और पाप या चित्रपटासाठी अरुणा इराणी यांना फिल्मफेयर बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचां अवार्ड ही मिळालेला आहे.

एक काळ असा होता की अरुणा इराणी यांचं नाव प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महबूब यांच्यासोबत ही जोडलं गेलं होतं. अश्या बातम्या आल्या होत्या की दोघांनी कुणालच न सांगता लग्न केलं आहे; पण हे त्या दोघांनी कधीही स्वीकार केलं नाही.

अरुणा इराणी यांनी इतक्या फिल्म मध्ये काम केलेलं आहे की त्यांनी वयाची चाळीशी पर्यंत लग्न करण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण पुढं १९९० मध्ये त्यांनी कुक्कु कोहली यांच्यासोबत लग्न केलं. कुक्कु कोहली आधी एक लग्न केलेलं होतं. आणि त्यांना मुलं ही होते हे त्यांना माहिती होतं.

अरुणा इराणी यांनी लग्न केलं पण त्या आई मात्र कधीच झाल्या नाहीत. कारण त्यांनी लग्न ४० च्या घरात केलं होतं. तेव्हा डॉक्टर ने त्यांना सल्ला दिला की जर समजा तुम्हाला आता मुलगा झाला तर त्याच्यात आणि तुमच्यात वयाचं फार अंतर राहील. त्यामुळे तिने निर्णय घेतला की आता आई बनायचं नाही. कारण तिच्या आणि मुळात एवढं अंतर नातं टिकवू शकलं नसतं.

Leave a Comment