‘रात्रीस खेळ चाले 3’ मधील या लोकप्रिय अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून थक्क व्हाल!
झी मराठी वहिनी म्हंटलं की त्यांचं एक स्लोगन आठवतं. उत्सव नात्यांचा नवा कथांचा. कारण त्यांच्या सध्या अनेक विषय असलेल्या मालिका चालल्या आहेत. त्यात एक मालिका मागे खूप लोकप्रिय झाली होती. जिचं नाव आहे रात्रीस खेळ चाले. होय त्या मालिकेत वेगवेगळ्या मनोरंजन करणाऱ्या गोष्टी होत्या. त्यात आता 3 रा पार्ट ही मालिकेचा सुरू झालेला आहेत. त्यात काही नव्याने पात्र काम करणार आहेत.
आता त्यातली एक अभिनेत्री उत्तम काम करताना दिसत आहे. तिने अल्पवाधित प्रेक्षकांना आपल्याकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे. ती कोण ? हे आज आपण जाणून घेणार आहोत तर चला सविस्तर माहिती घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून ‘अण्णा नाईक परत येणार?’ या टॅगलाईनने सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. त्यात ‘रात्रीस खेळ चाले ३’ चे कल्पक प्रोमोज दाखल झाले आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आता मालिका सुरू झाल्यावर या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांविषयी चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. पहिल्या दोन भागांतील काही व्यक्तिरेखा आपल्याला पुन्हा या भागातही आलेल्या दिसताहेत. तर काही नवीन व्यक्तिरेखाही दाखल होताना दिसतात.
यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे अभिरामची बायको. एक सुपरिचित चेहरा यानिमित्ताने आपल्याला मालिकेतून पदार्पण करताना दिसतो आहे. मालिकेतील ही व्यक्तिरेखा साकार करणारी अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी भाग्या नायर. भाग्या हिला आपण itsuch या युट्यु’ब चॅनेल वरील वेबसिरीज मधील भूमिकांतून वारंवार पाहिलं आहे.
रात्रीस खेळ चाले मध्ये आता ती लवकरच लोकप्रिय होईल असे चिन्हे दिसत आहेत. तिचं रूप त्यात वेगळं दिसत आहेत. त्याच सोबत ती अण्णा नाईक यांच्या बरोबर ही काम करणार म्हणल्यावर वेगळीच गोष्ट. तिचं वेबसेरिज मध्ये केलेलं काम खूप वेगळं होतं. त्यात तिची भूमिका आजही चर्चेत येते. भाग्या नायर एक उत्तम अभिनेत्री म्हणुन नावारूपाला येत आहे.
itsuch हे चॅनेल आणि त्यांच्या वेबसिरीज जशा लोकप्रिय आहेत त्याचप्रमाणे यातील कलाकार सुदधा. भाग्या ही या कालाकारांपैकी एक मुख्य कलाकार. भाग्या हिला अभिनयाची आवड पहिल्यापासून. तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धांतून स्वतःतील अभिनेत्रीला पैलू पाडले. तिचा सहभाग असलेल्या अनेक एकांकिकांनी पारितोषिकं ही पटकावली आहेत. सुंदरी, दादाची रक्षण सेना, उत्खनन या तिची भूमिका असलेल्या काही नाट्यकृती.
यापैकी सुंदरी या नाटकातील तिच्या भूमिकेसाठी तिला पारितोषिकही मिळालेलं आहे. रंगभूमीवर वावरत असताना तिने नवमाध्यम असणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम केलेलं आहे. वर तिने अभिनित केलेल्या वेबसिरीज चा उल्लेख झालाच. तसेच तिने क्षणिक ही हिंदी शॉर्ट फिल्मही केलेली आहे. त्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकार केली होती. तसेच itsuch च्या who’s next या शॉर्ट फिल्म मध्येही काम केलं होतं. एका अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या शॉर्ट फिल्मचा १४ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे.
तिला अनेक पुरस्कार ही एकांकिका नाटकात मिळालेले आहेत. त्यात तिच्या नावाची चर्चा ही खूप असते. आता तिचं मालिकेत असलेलं पात्र ही खूप वेगळं आहे.
अभिनयासोबतच भाग्या ही उत्तम नृत्यांगना ही आहे. तिने भरतनाट्यम चे प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच तिने अनेक उत्तम ब्रँड्स साठी मॉडेलिंग केलेलं आहे. महाविद्यालयीन जीवनात कलाक्षेत्रासोबतच भाग्या ही खेळातही अग्रेसर होती. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी भाग्या ही ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दाखल होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद ध’क्का’च. आजतागायत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी भाग्या या मालिकेतही उत्तम अभिनय साकार करत तिची व्यक्तिरेखा संस्मरणीय करेल हे नक्की.
तिला ही जी संधी मिळाली ती एका नव्या दमाच्या कलाकाराला किती गरजेची असते ही तीच सांगू शकेल. तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.