‘ते माझे चुलत काका आणि आत्या आहेत…’ मराठमोळ्या अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने पुणेकरांना केलं भावनिक आवाहन…

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिला आपण सर्वजण खूप छान ओळखतो. परंतु ही मराठमोळी अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे अचानकपणे चर्चेत आली आहे. काय आहे बरं यामागील खास कारण. चला तर मग जाणून घेऊया, आपल्या आजच्या या जबरदस्त आर्टिकल मधून…

मराठमोळी लावण्यवती अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिचे सध्या चर्चेत येण्याचं कारण देखील तसे खूपच खास आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रत्येक बँकांमधून शेव, फरसाण व इतर खाऊचे पदार्थ विकणारे हे आजोबा म्हणजे दुसरं- तिसरं कुणीही नसून अभिनेत्री भार्गवी चिरमुलेचे चुलत काका आहेत व त्यांच्या सोबत असलेली त्या आजोबांची बहीण म्हणजेच भार्गवीची आत्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhargavi Chirmuley (@bhargavi_chirmuley)

भार्गवी चिरमुलेने आपल्या चुलत काका व आत्यांचा एक फोटो शेयर करत, त्यांना मदत करा, असे आवाहन सर्वांना केले आहे. तसेच भार्गवीने सांगितले की, “हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत. आम्ही सर्व कुटुंबातील लोक नेहमीच या दोघींनाही मदत करतो. परंतु ते स्वाभिमानी व आत्मनिर्भर आहेत.

यासाठी मी माझ्या पुण्यातील सर्व मित्र- मैत्रीणींना नम्र विनंती करते की, तुम्ही आपल्याला जमेल त्या प्रकारे येथे वस्तू खरेदी करा. जेणेकरून काका व आत्यांना थोडीफार मदत होईल. आपणां सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.” असे देखील भार्गवी चिरमुलेने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या चुलत काकांचे वय 84 वर्षे आहे तर त्यांच्या काकांची बहीण ही 65 वर्षीय आहे. आपल्या मूकबधिर असलेल्या बहिणीसोबत हे काका पुण्यातील सदाशिव पेठेतील वाड्यात राहतात. कोरोना सारख्या घातक संकटाआधी हे दोघेही बँकांमध्ये शेव, फरसाण व इतर खाऊचे पदार्थ विकायचे. परंतु त्यानंतर मात्र कोरोनाने सगळेच उद्ध्वस्त केले.

आजही हे दोघे बँकेत आपले खाऊचे पदार्थ घेऊन जातात. मात्र बँकेतील कर्मचारी हे त्यांना आतमध्ये येऊच देत नाही. कोरोना महामारीच्या भीतीपोटी व वृद्ध काका व आत्यांच्या काळजीपोटी त्यांना बँकेत येण्यास सक्त मनाई केली आहे.

मग आपल्या उदरनिर्वाहासाठी हे चिरमुले काका व त्यांची बहीण उदबत्ती, वाती व पंचांग घेऊन स्टुलवर विकायला बसतात. तसेच आता त्यांनी नववर्षानिमित्त दिनदर्शिका देखील विकायला ठेवल्या आहेत.

मित्रांनो स्टार मराठीतर्फे आम्ही देखील तुम्हांला नम्र विनंती करतो की, पुण्यात राहणाऱ्या सर्व आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींनी सदाशिव पेठेतील या चिरमुले काकांकङून आपल्या गरजेनुसार वस्तूंची खरेदी करा आणि या वयोवृद्ध पण जिद्दी आणि स्वाभिमानी काकांच्या व आत्यांच्या मेहनतीला आपले लाखमोलाचे हातभार लावा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment