‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणार हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

सोनी मराठी या चॅनल वरील लोकप्रिय मराठी मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आता एका वेगळ्या रंजक वळणावर आली असून, जसजसे कथानक पुढे सरकत जात आहे तशी ही मालिका एक वेगळ्या उंचीवर जात आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेचे कथानक आता एका मनोरंजक वळणावर आले आहे. या लोकप्रिय मालिकेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले आता जिजाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा विडा उचलला आहे. सध्या या मालिकेत शहाजीराजांना बंगळूर प्रांतात जावं लागले होते त्या वेळचा भाग दाखवत आगेत. जिजाऊ आता शिवबांना घेऊन पुणे परगण्यात दाखल झालेल्या आहेत.

स्वराज्याच्या उभारणीचा रोमांचकारी इतिहास आणि सोबतच महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिती, त्यावेळी घडलेल्या देदिप्यमान ऐतिहासिक घटना पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत. आता ही मालिका काही वर्षे पुढे जाणार म्हणजेच लीप घेणार असुन, त्यामुळे मालिकेत प्रेक्षकांना यात काही नवे कलाकार पहावयास मिळणार आहेत.

See also  अरेंज मॅरेज करताना करताना करा फक्त हे काम, लव्ह मॅरेजवाल्यांपेक्षा देखील सुखी आयुष्य जगालं...

bhargavi chirmule as jija mata

मराठी रसिकांची आवडती अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही परत टेलीव्हिजन वर कधी दिसणार याची तिचे चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत होते. आपल्या या भूमिकेबद्दल बोलतांना भार्गवी म्हणाली, की ‘एक आदर्श माता म्हणून ज्यांचं अभिमानानं नाव घेतलं जातं, अशी व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय हे माझं भाग्यच आहे.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलेली आहे. त्याच वेळी मला देखील तिचा एक भाग होता आलंय ही भावनाच खूप सुखावणारी आहे. महाराष्ट्राचं दैवत असणारे हे व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा मला अभिमान आहे.’

भार्गवी चिरमुलेसह ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत शहाजीराजेंच्या भूमिकेत मागे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनु मोघेसुद्धा दिसणार आहेत. तर बाल शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छोट्या संभाजींची भूमिका याच देवेश ने साकारली होती. मराठी प्रेक्षकांना भार्गवी बऱ्याच काळानंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

See also  लग्नासाठी मुलाची उंची मुलीपेक्षा जास्त का असावी, त्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, कारण ऐकून थक्क व्हाल!

राजमाता जिजाऊ म्हणजे कुशल नेतृत्व, झळकते कर्तृत्व, मातृत्वाची मूर्ती! ‘हळवी मातोश्री’ आणि तितकीच ‘कणखर राज्यकर्ती’ सुद्धा. जिजाऊंच्या अशा दोन्ही बाजू मालिकेच्या माध्यमातून पोहचवण्यात यशस्वी ठरलेल्या या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठता कायम राखली आहे.

जिजाऊंचं पुण्यात येणं हे स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची घडी बसविण्याचीजबाबदारी ‘राजमाता जिजाऊंवर येऊन पडली.

निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भयानक होती. महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींच केंद्र ठरलेल्या पुण्यातील या घटनांचे चित्रण आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

पुण्याच्या वेशीवर मुरार जगदेवाने खुपसलेली पहार उखडणे, नांगराला सोन्याचा फाळ लावून नांगरलेली पुण्याची जमीन, पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना, लाल महालाची उभारणी यातलं नेमकं काय काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता मालिकेच्या येणाऱ्या काही भागातून उलगडली जाणार आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार आपली भूमिका कशा प्रकारे साकारतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

See also  काय आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी बहुसंख्य श्रद्धाळू स्त्रीवर्गाद्वारे मनोभावे वाचली जाणारी श्री महालक्ष्मी कथा?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment