“आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही” अभिनेत्री हेमांगी कवीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेयर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टी असो किंवा मग बॉलीवुड इंडस्ट्री…यातील काही कलाकार हे सतत चर्चेत असतात. अगदी त्याप्रमाणेच काही मोजक्या चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी ही आहे. बेधडकपणे आणि स्पष्ट, परखङ बोलणाऱी असे हिचे व्यक्तीमत्व आहे. इन्स्टाग्रामवर ती आपले फोटोज् नेहमी चाहत्यांसाठी शेयर करते. तिच्या अदाकारी व ग्लॅमरस लुकवर तिच्या फॅन्सचा लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील जबरदस्त होतो.

अभिनेत्री हेमांगी कवी ही हल्ली पुन्हा एकदा आपल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे सर्वत्र तिच्या या पोस्टची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तिने एक भली- मोठी पोस्ट लिहिली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आपल्या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिले आहे की,”लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा….या वर्षापासून आपल्या दोघांच्याही लग्नाला किती वर्षे झाली आहेत. असे म्हणून वर्षे मोजत बसायची नाही. तर आपल्याला एकमेकांच्या सानिध्यात प्रत्येक क्षण आनंदात जगायचा आहे. आतापर्यंत एकमेकांना सहन करत आलो…पटत नसले तरीही संसाराची गाडी पुढे ढकलत आलो, असे मी काहीच म्हणणार नाही. कारण आपण कसे आहोत, हे आपल्याला खूप चांगले माहीत आहे.

See also  उदयनराजे भोसलेंवर देखील ‘पुष्पा’ च्या प्रेमात, लुंगी परिधान करून काढले त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी

आपल्या संसाराच्या सुरूवातीच्या काळात माझं चिङणं..अन् तुझं कमालीचं शांत असणं. मी अतिशय रोमॅन्टिक आणि तू बिलकूल अनरोमॅन्टिक. मी खूपच जास्त व्यवहारिक आणि तू खूपच संवेदनशील. मी अतिशय कंजूष आणि तू फार खर्चिक. एवढ्या वर्षातील सहवासाने आपल्या सवयी एकमेकांशी पूरक झाल्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ मुळीच सोडायची नाही. हे एवढ्या वर्षांत तर आपल्याला जमलं आणि यापुढे देखील असचं जमवू, तेवढा समंजसपणा आपल्या नात्याला लाभो !”

यामध्ये पुढे हेमांगी म्हणते की,”आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील. असेच क्षण पुढे देखील येत राहो…आपण दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि एकमेकांना सोडू शकत नाही. आजच्या खास दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! नेहमी असेच भांङत राहू, एकमेकांशी झगडत राहू, आनंदी राहू आणि खूप समाधानी राहू.” हेमांगीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील भरपूर कमेंट्स केल्या आहेत.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतून अ'चानक झाल्या गा'यब, हि अभिनेत्री तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment