‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने खरेदी केला इतक्या महागाचा फ्लॅट, किंमत ऐकून थक्क व्हाल!
फुलपाखरू “झी युवा” वरील प्रचंड गाजलेली मालिका. आणि या मालिकेतील क्युट कपल म्हणजे मानस आणि वैदेही. यातल्या वैदेहीने अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाची व सोबतच सौंदर्यातील निरागसता आणि क्युटनेसची तरुणाईवर एक वेगळीच जादू करून सोडली.
अनन्या या मराठी चित्रपटातून हृता मराठी सिनेमांमध्ये पाऊल ठेवताना दिसत आहे. ह्रताने दूर्वा या मालिकेतही दुर्वा या पात्राची भूमिका पार पडली होती. परंतु तरीदेखील तिला खऱ्या अर्थाने चांगली प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे फुलपाखरू या मालिकेतल्या भुमिकेमुळे.
झी युवा वरील वरील ही मालिका आणि या मालिकेतील अनेक प्रसंग आज इंस्टाग्रामवर या ना त्या माध्यमातून शेअर होत असतात. फुलपाखरू आणि या मालिकेतील मानस व वैदही सदाबहार पात्रे ठरली यात काहीच शंका नाही.
ह्रताबद्दल सांगायचं झालं तर तशी ती एक कोकणी मुलगी आहे, असं म्हटलं तरी चालेल. कारण तिचं मूळ गाव हे रत्नागिरी परंतु तिचा जन्म आणि तिची जडणघडण ही मुंबईतच झाली. आपल्या वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने पहिली मालिका केली ती म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवर, तिचं नाव होतं “दुर्गा”. दुर्गानंतर ती थेट पहायला मिळाली ती म्हणजे फुलपाखरू या मालिकेत.
“दादा एक गुड न्यूज आहे” या व्यावसायिक नाटकाने ती मराठी रंगभूमीवरदेखील अवतरली, ज्यात ती उमेश कामतसोबत काम करताना पहायला मिळतं. “स्ट्रॉबेरी शेक” या एका शाॅर्टफिल्ममधेही तिने काम केलं जी लाॅकडाऊनदरम्यानच्या काळात ओटीटी झी 5 वर रिलीज झाली आहे. “अनन्या” हा जरी तिचा पहिला मराठी सिनेमा ठरणार असला तरी अजून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणं बाकी आहे. सध्या अजूनही एक खबर मिळाली ती म्हणजे, ह्रता एका वेबसिरीजमधेही दिसणार आहे.
आपल्या सौंदर्यातून तरूणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ह्रताने नुकताच एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे. सध्या तिनेच सोशल मीडियावर पोस्ट करत या आनंदाच्या बातमीची खबर दिली आहे. ह्रताचे चाहते नेहमीच तिच्या प्रत्येक एकूणएका पोस्टकडे वाट पाहून बसलेले असतातचं. आणि त्यातही तिने अशी काही भन्नाट माहिती शेअर केल्यावर सर्व रसिकप्रेक्षकांनी तिच्या पोस्टवर लाईक्स आणि भरगच्च कमेंट्सचा वर्षावही केला आहे.
तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून समजतं आहे की, तिने नवा फ्लॅट हा ठाण्यात खरेदी केला आहे. “डुएट” या वेबसिरीजमधून ह्रता आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही रसिकप्रेक्षकांच्या भेटीस आणि पसंतीस उतरणार हे निश्चित. या सिरीजमधून ह्रता अदिती हे पात्र साकारणार आहे.
गेल्याच आठवड्यात ह्रताचा एक डान्सचा व्हिडिओदेखील भरपूर शेअर झाला होता, आणि त्याची सर्वत्र चांगलीच तारिफ होत होती. तर आता प्रत्येकाला निश्चितच ह्रताच्या पुढील प्रत्येक कामांकडून फुलपाखरूमधल्या भुमिकेसारख्या चांगल्याच अपेक्षा आहेत, हे अगदी खरयं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!