अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा साखरपुडा सोहळा संपन्न, या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लवकरच होणार ती विवाहबद्ध
मराठी सिनेसृष्टीतील अप्रतिम सौंदर्याची मनमोहक अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वतः अभिनेत्री हृता हिनेच आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या खास व्यक्तीविषयी चाहत्यांना सांगितले होते. खरंतर ही मराठी इंङस्टीसह तिच्या सर्व फॅन्ससाठी देखील सरप्राईज न्यूज होती. ऋताचे हृदय चोरणाऱ्या या व्यक्तीचे नाव प्रतीक शाह असे आहे.
तर मित्रांनो आता ह्या फुलपाखरू फेमच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ती म्हणजे ऋता दुर्गुळे हिने प्रतिक शहा सोबत नुकताच साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रतिक शहा सोबत सुंदर ङान्स करताना दिसत आहे.
याआधी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो शेयर करत त्या पोस्टला #8daystogo असे कॅप्शन दिले होते. त्यामुळे 8 दिवसांनंतर ऋता आणि प्रतिक हे दोघेही आपल्या नवीन आयुष्याची सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात होते. सध्या झी मराठी वाहिनीवरील “मन उङु उङु झालं” या मालिकेत ऋता दुर्गुळे लीङ भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे “दादा एक गुङ न्यूज आहे” या नाटकात सुद्धा ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तिच्या या नाटकाला चाहत्यांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे.
तर दुसरीकडे प्रतीक शाह हा सुद्धा चित्रपट आणि टिव्ही विश्वातील एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत तेरी मेरी एक जिंदङी, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, मनमोहिनी या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचे जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये हृता 6 व्या क्रमांकावर आहे. तसेच ऋता दुर्गुळे ही पहिलीच अभिनेत्री आहे, जिचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॅन्स ग्रुप आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.