आपल्या सासूबाईंवर खूप प्रेम करते अभिनेत्री काजोल देवगण, हा किस्सा ऐकून तुम्हीपण व्हाल थक्क…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अभिनेत्री काजोल हिच्या अदाकारी सौंदर्याचे संपूर्ण जगभरात लाखो फॅन्स आहेत. तिच्या अभिनयाचे तर सगळेच दिवाने आहेत. का नसणार बरं…..1990 च्या दशकात तिने आपल्या चाहत्यांना वेङ लावून ठेवले होते. त्यामुळेच तर काजोलचे लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. काजोलच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घ्यायला कुणाला बरं आवडणार नाही.
बहुतेक लोकांना काजोल ही स्वभावाने थोडी आगाऊ वाटते. ती स्वतः सुद्धा हे मान्य करते. परंतु ती स्वतः खूप परखडपणे बोलणारी आणि मूङी स्वभावाची आहे, असे सांगते. काजोलच्या या अशा स्वभावामुळेच तिचे आपल्या सासू सोबत सुद्धा नेहमी खटके उङायचे. तिने स्वतःच हे सांगितले होते. परंतु त्यानंतर एक असा किस्सा घडला, ज्यामुळे काजोल आपल्या लाडक्या सासूबाईंच्या अगदी प्रेमात पडली.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या Tweak India या चॅट शो मध्ये काजोलने एक मुलाखत दिली होती. यामध्ये तिने आपल्या सासूबाईंचा खुलासा केला आहे. काजोल ने सांगितले की, लग्नाच्या अगोदर मी अजय च्या आईला ‘आं’टी’जी’ अशी हाक मारायचे. मला त्यांना आंटीजी किंवा आई असे म्हणावेसे वाटत नव्हते.
एकदा माझ्या सासूबाईंच्या मैत्रीणी घरी आल्या होत्या. त्यावेळी मी सासूबाईंना आंटीजी अशी हाक मारली. ती हाक ऐकून त्या सगळ्या आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या. “हे काय, तुझी सून अजूनही तुला आंटीजी म्हणते. आई अशी हाक का बरं देत नाही.” त्यावर सासूबाईंनी सडेतोड उत्तर दिले की, माझी सून जेव्हा मला आई अशी हाक देईल, तेव्हा ती अगदी मनापासून असेल. फक्त नावापुरते ती मला आई म्हणणार नाही. तोपर्यंत मी त्या क्षणाची वाट पाहील. माझ्या सासूबाईंचे ते वाक्य मी ऐकले आणि तेव्हापासून मी त्यांच्या अगदी प्रेमात पडली.
त्या दिवसापासून सासूबाईंविषयी माझ्या मनात आदर, सन्मान व प्रेम निर्माण झाले व मी त्यांना “आंटीजी” ऐवजी ‘म’म्मी’ म्हणू लागले. माझ्या सासूबाईंनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधीच जबरदस्ती केली नाही.. मला माझी स्पेस त्यांनी नेहमीच दिली. मी जशी आहे, तसेच त्यांनी मला बेधडकपणे स्वीकारले. अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचे लग्न 24 फेब्रुवारी 1999 रोजी झाले होते. तर आता त्यांना न्यासा नावाची एक मूलगी व युग नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.