अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा पती आहे बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती, प्रेमविवाह करून थाटला सुखी संसार…
मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये जशा एकाहून एक सुंदर अशा परमसुंदरी आहेत. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मराठी इंङस्टीमध्ये सुद्धा अफलातुन सौंदर्याची खाण अशा परमसुंदरी आहेत. ज्यांच्या सौंदर्याची जादू तर कित्येक दशकांपासून त्यांच्या चाहत्यांना भुरळ पाडते. अशीच एक अभिनेत्री किशोरी शहाणे. किशोरी ह्या आता चित्रपटात जरी काम करत नसल्या तरीही त्यांच्या अभिनयाची छाप ही आपल्या टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिकांमधून तर अवश्य पाहायला मिळते.
आपल्या वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणाऱ्या किशोरी शहाणे यांनी फक्त मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून किशोरी शहाणे वीज यांची ओळख आहे. त्यांचा “प्रेम करूया खुल्लम खुल्ला” हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्यासोबत स्क्रीन शेयर केली होती.
मराठी कलासृष्टीत किशोरी शहाणे यांच्या या चित्रपटाला आजही अग्रगण्य स्थान आहे. कारण म्हणजे याच चित्रपटामुळे तर मराठी सिनेसृष्टी ला एक लकाकी मनमोहक चेहरा मिळाला. मराठी सिनेसृष्टीत चांगली ओळख निर्माण झाल्यावर त्यांनी हिंदी कलाविश्वात पाऊल टाकले.
हजारो- लाखो हृदयाची धडकन असलेल्या किशोरी ने हिंदी चित्रपट सृष्टीतील एका नामांकित दिग्दर्शकासोबत आपला संसार थाटला. दिपक बलराज वीज असे त्यांच्या पतीचे नाव आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, किशोरी – दिपक यांचे हे लवमॅरेज आहे..बरं का. खरंतर त्यांची लवस्टोरी ही अगदी निराळीच आहे. दिपक बलराज वीज यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 22 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
एका मुलाखतीत किशोरी शहाणे यांनी आपली रोमॅन्टिक लवस्टोरी सांगितली. “हप्ता बंद” या चित्रपटात जॅकी श्रॉफ हिरो होता. तर त्यावेळी मी मराठी चित्रपटांत काम करत होते. तेव्हा जॅकी आणि माझी ओळख महाकाली, होली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये झाली. तेथे तो शूटिंगला यायचा. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली.
एकदा जॅकी मला म्हणाला की,”एक ङायरेक्टर है, उन्हे एक मराठी एक्ट्रेस चाहिए” मग जॅकी ने माझी ओळख दीपक बलराज सोबत करून दिली. पुढे मग दीपक ने मला हप्ता बंद या चित्रपटात भूमिका दिली. तेव्हा सेटवर आमची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले.
दीपक बलराज यांच्यामुळेच “बॉम्ब ब्लास्ट” या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. “घर- एक मंदीर” “जस्सी जैसी कोई नहीं” आणि “सिंदूर” या हिंदी मालिकांमधील किशोरी शहाणे यांच्या भूमिका अफाट गाजल्या.
तर आता किशोरी- दीपक बलराज यांना एक मुलगा असून त्याचे नाव बॉबी असे आहे. “वाजवा रे वाजवा” “बाळाचे बाप ब्रह्मचारी” “सगळीकडे बोंबाबोंब” अशा सुपरङुपरहिट चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कॉन्ट्रोवर्शियल शो बिग बॉस मराठी च्या दुसऱ्या सीझन मध्ये देखील त्या सहभागी झाल्या होत्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.