माझ्या घरात घुसून जबरदस्ती करत राहिला किस, ‘या’ अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुंबई: अश्लील विडिओ निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सध्या राज कुंद्रा 14 दिवसाच्या न्यायिक कोठडीमध्ये आहे. त्याने दाखल केलेला जामिन अर्जही कोर्टाने फेटाळला. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सने राज कुंद्रा व हॉटशॉटबद्दल अनेक खुलासे केले. यात प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राचाही समावेश आहे. आता शर्लिन चोप्राने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा पोर्नोग्राफी प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलसमोर हजर झाली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावेळी तिने राज कुंद्रावर लैंगिक अत्याचाराबद्दल दाखल केलेली एफआयआरही जाहीर केली. शर्लिन चोप्रा यांनी शिल्पा शेट्टीच्या पतीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला.

See also  राज कुंद्रा प्रकरणावर ‘शक्तिमान’ने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाले शिल्पा शेट्टीला 120%...

काय आहे प्रकरण?

2019 च्या सुरुवातीला राज कुंद्राच्या बिजनेस मॅनेजरने शर्लिनला एका कांच्या प्रस्तावाबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावले होते. 27 मार्च 2019 रोजी झालेल्या बैठकीनंतर एका संदेशावरून झालेल्या वादामुळे राज कुंद्रा काहीच न सांगता तिच्या घरी आल्याचा शर्लिन चोप्राने दावा केला. तसेच तिच्या घरी आल्यानंतर  तिने विरोध करत असतानाही राज तिचे जबरदस्ती चुंबन घेत राहिला. शर्लिन चोप्रा म्हणाली, “मला त्यावेळी एका लग्न झालेल्या व्यक्ती सोबत संबंध ठेवायचे नव्हते. मला माझा बिझनेस आणि एंजॉय मिक्स करायचा नव्हता.मी नकार देत असतानाही तो थांबला नाही. मी घाबरले होते. थोड्या वेळाने मी त्याल दूर ढकलण्यास यशस्वी झाली आणि पळत जाऊन बाथरूम मध्ये लपले.”

तिच्या या धक्कादायक आरोपानंतर राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्याला जामिन मिळण्याची शक्यताही फारच कमी झाली आहे.

See also  राज कुंद्राच्या पो'र्न फिल्म्ससाठी काम करायची ही नैंसी भाभी? कित्येक मूलींना घातला होता यांनी गंडा...
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment