लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली अभिनेत्री मौनी रॉय मुंबईत, गुलाबी रंगाचा दुपट्टा आणि शरारा मध्ये दिसत होती खूपच सुंदर
टेलिव्हिजनवरील सर्वांत सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही हल्ली खूप प्रसिद्धीत आहे. या “नागिन” फेम ने आपला लाँगटाइम बॉयफ्रेंड सूरज नांबियार सोबत 27 जानेवारीला लग्न केले. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. लग्नानंतर आज मौनी मुंबईत आपल्या सुंदर लुकमध्ये दिसली. लग्नानंतर ती थेट आपल्या पतीसोबत गोव्याला गेली होती त्यानंतर ती आता मुंबईत आली आहे.
खरंतर मौनीला पहिल्यांदाच पब्लिक मध्ये पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. आपल्या भांगात कुंकू भरून आणि गुलाबी रंगाचा शरारा ओढणीसह परिधान करून ती अप्रतिम गोड दिसत होती. मेहंदी लावलेल्या हातांवर मौनीचा लुक भारीच खुलून दिसत होता.
अभिनेत्री मौनी रॉय ने जेव्हा आपल्या आसपास मीडियाला पाहिले. तेव्हा तिने आपल्या तोंडावरील मास्क काढून सर्वांना हाय केले. मौनीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटीज फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. अभिनेत्री मौनी रॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.
तुम्हांला ठाऊकच असेल की, मौनीने 27 जानेवारीला सूरज नांबियार सोबत गोव्याला विवाह केला. या दोघांनीही बंगाली आणि मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. लग्नानंतर मौनी जशी मुंबईत आपल्या सासरी पोहोचली, तसे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. मौनी आणि सूरज यांच्या लग्नसमारंभात त्यांच्या नातेवाईकांसह काही खास मित्रमंडळी सुद्धा उपस्थित होते. ज्यामध्ये मौनीकङून आमना शरीफ आणि मंदिरा बेदी ह्या दोघीही प्रत्येक लग्नाच्या विधीमध्ये उपस्थित होत्या. तिच्या लग्नाचे सर्व विधी सोशल मीडियावर वायरल करण्यात आले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.