या” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या या विक्रमाची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ व ‘इंडिया रेकॉर्ड’, जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

होय मित्रांनो! एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलाय हा नवा विक्रम. जगातील सर्वाधिक उंचीवरील तुंगानाथ शिवमंदिरात तिने केली नृत्य आराधना. तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे, मराठी अभिनेत्री मीरा जोशी.

81908763

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या डान्समुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मात्र   यावेळेला ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

तिने जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगानाथ शिवमंदिरात नृत्य आराधना करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. तिच्या नृत्याविष्काराची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.

See also  अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा पती आहे बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती, प्रेमविवाह करून थाटला सुखी संसार...

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये असलेले तुंगनाथ शिवमंदिर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले मंदिर आहे. तुंगनाथ पर्वतावर असलेले हे शिवमंदिर ११ हजार ३८५ फूट उंचीवर आहे. मीराला अभिनयाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे. १६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता तिने चंद्रशीला शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात केली. ती सूर्योदयाच्या वेळी शिखरावर पोहचली. त्याखालीच असलेल्या प्राचीन तुंगानाथ शिवमंदिरासमोर मीराने नृत्य सादर केले.

मीरा जोशीने या यशाचे श्रेय आईवडील आणि भावाला दिले आहे. याव्यतिरिक्त स्मित शाह, तुषार सुभेदार, चिंतन पांचाळ, आनंद बनसोडे या टीम सदस्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने सांगितले की, मी भगवान शंकराची भक्त असून तुंगानाथ मंदिराला भेट द्यावी हे माझे स्वप्न होते आणि ते आता साकार झाले आहे.

81909015

१६ मार्च रोजी तुंगानाथ मंदिर परिसरात बर्फ नव्हता. त्या संधीचा फायदा घेत मी नृत्य केले. खरे तर तापमान ६ डिग्रीपर्यंत होते. तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने माझे ध्येय पूर्ण झाले.

See also  न्यू'ड फोटो शेअर करून झाला आणि आता म्हणतायं "ख'ड्या'त गेलं सगळं", पहा अभिनेत्री वनिता खरातची ही गजब बात!

मीरा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मराठीतील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून मीराकडे पाहिले जाते. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून मीराने टीव्ही क्षेत्रात डेब्यु केला. छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मीराला खरी ओळख मिळाली. मीरा एक नृत्यांगना आहे. मीराने भरतनाट्यम आणि कथ्थक या नृत्याचे शिक्षण घेतले आहे. अनेक डान्सिंग शोमध्ये मीराने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. मीरा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटोज अपलोड करत असते.

Meera Joshi

मीराच्या आजवरच्या कामाबद्दल सांगायचे तर ती “फक्त मराठी” वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत झळकली होती. यात तिने एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती. याशिवाय मीरा ‘वृत्ती’ नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

See also  'दे ध'क्का' मधील सायली आता दिसतेय अशी, तिचे नवीन फोटो पाहून थक्क व्हाल!

या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘दिया और बाती’, ‘कैसी है यारियाँ’ या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केले होते. मीराने ‘य़ुथ’ आणि ‘तुझ्याविना मर जावा’ या चित्रपटात काम केले आहे. मीराने ‘मायरा’ या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे.

IMG 20180504 081549 294 15254145164691

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment