अभिनेत्री मिताली मयेकर लंडनच्या ट्रिपवर जाऊन करतीये, मुंबईतील फेमस मित्रांची टिंगल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठमोळी अभिनेत्री मिताली मायेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असते. मितालीच्या पोस्ट पाहून अनेकजण नेहमी छान छान कमेन्ट करत असतात. तिचे खूपसे फोटो व्हायरल होत असतात, शिवाय काही मजेशीर व्हिडीओ देखील तिचे पाहायला मिळतात. सिद्धार्थ सोबत ती अनेकदा नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते, लग्नानंतर हे जोडपे सोशल मीडियावर दिवसेंदिवस प्रचंड सक्रिय झाले असून सर्वत्र या दोघांची जोडी विशेष लक्ष वेधी ठरत असते.

भटकंती हा मितालीच्या आवडीचा विषय आहे, ती नेहमीच सर्वत्र फिरताना दिसत असते. कधी या ठिकाणी असते तर कधी त्या ठिकाणी असते. इन्स्टाग्रामवर नेहमी नवनवीन ठिकाणचे फोटो ती शेअर करत असते. तिची ही आवड तिला आणखी मोकळं बनवते, तिचे विचार आणि सौंदर्य दोन्हीही आणखीन खुलवते. एक अभिनेत्री या नात्याने तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे, तिचे अनेक चित्रपट व मालिका सक्रिय आहेत. शिवाय सोशल मीडियावर देखील ती विशेष सक्रिय असतेच. प्रत्येक वेळी चाहत्यांना अपडेट देत असते.

See also  'कहो ना प्यार है' मधील रितिक रोशन सोबत काम करणारा तो लहान मुलगा आज इतका बदलला आहे कि ओळखणे ही झाले कठीण...

मितालीने वयाच्या तेराव्या वर्षी बालकलाकार म्हणून इरफान खान यांच्या “बिल्लू” चित्रपटात काम केले होते. त्यामध्ये तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका निभावली होती. तिने उंच माझा झोका, फ्रेशर्स, असंभव, तू माझा सांगाती यांसारख्या मालिकेत सुद्धा काम केले होते. तिच्या मालिकेतील अभिनय आजही लोक खूप आवडीने पाहतात. तसेच तिने उर्फी, यारी दोस्ती, आम्ही बेफिकर, स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. मिताली खूपच आकर्षक अभिनय करते, त्यामुळे तिच्या सर्व भूमिका लोकप्रिय आहेत.

मिताली सोशल मीडियावर आपले निरनिराळे फोटो शेअर करत असते, तिचे फोटो पाहून चाहते नेहमीच नव्याने तिच्या प्रेमात पडतात. तिची स्माईल खूप गोड आहे, तिच्या प्रत्येक फोटोमध्ये ती पुन्हा पुन्हा खुलून दिसते. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही चांगले कलाकार आहेत, तसेच उत्तम पती पत्नी देखील आहेत. त्या दोघांची जोडी अनेकांना प्रचंड आवडते. त्यांच्या नात्यातील गोडवा नेहमीच दिसून येतो, चाहते त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी देखील नेहमी उत्सुक असतात. मितालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, तिचा हा फोटो बघता बघता प्रचंड व्हायरल होत आहे.

See also  बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूपच सुंदर दिसते शाहरुख खानची भाची, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडालं!

फोटोमध्ये मितालीचा साधा लुक आकर्षक वाटत आहे, तिने आपल्या स्टोरी मध्ये अपूर्व रांजनकर यांची सोशल म्हणत मस्करी केली आहे. तसेच churros मेट म्हणत तिने अनुप आणि मॅडी या दोघा मित्रांना आठवण करून दिली आहे. मित्रहो तुम्ही देखील तिचा फोटो पाहून नक्कीच तिच्या प्रेमात पडाल. एका गोड स्माईल सोबत हा फोटो सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणत आहे. मिताली नेहमी अशीच चर्चेत राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी तिला भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment