पद्मिनी कोल्हापुरे यांनी तब्बल इतक्या वर्षांनंतर केला स्वतःच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नामांकित अभिनेत्री होऊन गेल्या. ज्यांनी स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाने व अप्रतिम सौंदर्याने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करून घेतले. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे जिने स्वतःच्या मेहनतीने इंङस्टीमध्ये भरपूर यश मिळवले. आहिस्ता- आहिस्ता, वो सात दिन, प्रेमरोग, विधाता अशा अनेक सिनेमांतील आपल्या मनमोहक भूमिकांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी रसिकांच्या मनात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.

पद्मिनी यांच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, आकर्षणता आणि घा’याळ करणारं सौंदर्य यामुळे 80 च्या दशकात सुद्धा त्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली. परंतु पद्मिनी कोल्हापुरे ह्या अभिनय क्षेत्रात खरंतर अ’पघा’ताने आल्या. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारखे त्यांचे एक उत्कृष्ट गायिका बनण्याचे स्वप्न होते.

See also  अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच नसिरुद्धीनं शाह यांच्या सोबत होत हे नातं...

padmini

आपलं नशीब आजमावण्यासाठी त्या सिनेमात आल्या होत्या. परंतु नंतर चित्रपट व अभिनय हेच त्यांचे आयुष्य बनले. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी प्रसिद्ध निर्माते टूटू शर्मा यांच्यासोबत लग्न करून संसार थाटला. कपिल शर्माच्या शो मध्ये आल्यावर त्यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी शेयर केल्या होत्या.

कपिल शर्मा यांनी पद्मिनी कोल्हापुरेला विचारले की,”टुटू उर्फ प्रदीप शर्मा यांनी तुम्हांला पेमेंट दिले नव्हते. म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्यांच्याशीच लग्न केले.” या दोघांचीही भेट 1986 साली “ऐसा प्यार कहाँ” या सिनेमाच्या सेटवर झाली होती. तेथेच त्यांची मैत्री झाली व त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते.

60923607

मात्र पद्मिनी कोल्हापुरे यांच्या घरच्यांना ते लग्न अजिबात मान्य नव्हते. कारण ते दोन्ही कुटुंबीय वेगवेगळ्या धर्मांचे होते. टूटू व पद्मिनी यांनी आपापल्या परीने घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्यांनी स्वीकारलं नाही. शेवटी एक दिवस पद्मिनी प्रदीप सोबत पळून गेली आणि 14 ऑगस्ट 1986 ला त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले. तर आत्ता त्यांना प्रियांक नावाचा एक मुलगा देखील आहे.

See also  वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंडला! मावशी आली आणि नंतर जे घडलं...

पद्मिनी यांना अभिनयाची नव्हे गाण्याची खूप आवङ होती. परंतु त्यांनी अभिनेत्री व्हावे, अशी त्यांच्या आजीची इच्छा होती. आपल्या वयाच्या अवघ्या 17- 18 व्या वर्षात त्यांनी आईची भूमिका साकारली होती. त्या वयात आईपण काय असतं, हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणे, हे त्यांच्यासाठी खूपच कठीण काम होते.

marriage10

1974 साली “एक खिलाडी बावन पत्ते” या चित्रपटातून त्यांनी इंङस्टीमध्ये पदार्पण केले. फक्त 9 वर्षाची असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल ठेवले होते. पुढे त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु त्यांच्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या मनावर आजही कायम आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment