प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा सावंत पडलीय या अभिनेत्याच्या प्रेमात? अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!
मराठी सिने इंडस्ट्रीमधल्या अनेक ग्लॅम आणि ग्लोरियस चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे अभिनेत्री पुजा सावंत. पुजा सावंत सध्यातरी सोशल मीडियावर खुप साऱ्या चर्चांमुळे प्रकाशझोतात राहताना पहायला मिळते आहे. पुजा सावंत सध्या महाराष्ट्राची बेस्ट डान्सर या कार्यक्रमाची जज म्हणून काम करत असलेली पहायला मिळते आहे.
सध्या पुजा सावंत एका मराठी अभिनेत्यासोबत हॅंगआऊट करत असल्याची चर्चा आहे. तुम्हाला कदाचित ही गोष्ट थोडी आश्चर्याची वाटेल पण पुजा सावंत गश्मिर महाजनी या अभिनेत्याला डेट करत असल्याची गोष्ट पहायला मिळते आहे. सध्यातरी बाॅलीवुड हिंदी सिनेमाप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची ओळख असणारा डॅशिंग अभिनेता म्हणजे गश्मिर महाजनी.
व्हॅलेंटाईनच्या वीक मधे दोघेही सोबत असल्याच्या चर्चा वर येऊ लागल्या आहेत. काहींना दोघांच्या सवांदाचे खास मेसेजदेखील वाचायला मिळाल्याची चर्चा आहे. गश्मिर महाजनी चक्क पुजा सावंतसाठी काहीतरी खास प्लॅन करतानाची खबर सर्व सोशल मीडियावर वाऱ्याप्रमाणे पसरली आहे. या दोघांच्या चॅटमधील काही खास संवाद असे होते की, गश्मिरने विचारलं, कशी आहेस? काय प्लॅन उद्याचा?
त्यावर पुजा म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन असल्याने खास फॅमिलीसोबतच वेळ घालवणार आहे. त्यावर गश्मिर म्हणाला, चल उद्या भेटू, तुला सरप्राईज द्यायचयं. पुजा म्हणाली, तू मस्करी करतोस का? गश्मीर म्हणाला, नाही खरचं सांगतो. नंतर थेट पुजा म्हणाली, मी उत्सुक आहे, प्लीज सांग. त्यानंतर गश्मिर पुन्हा म्हणाला, उद्या व्हॅलेंटाईन आहे वेळ नक्की काढ.
मुळात दोघांमधील फेसबुकवर घडलेल्या या चॅटमुळे सर्वांना आता दोघांच्या आयुष्यात काय गुल खिलत आहे? याची आतुरता लागली आहे. मुळात एक गोष्ट थोडी ट्रिकी आहे. कारण कदाचित जर अशा प्रकारची चॅट ही एखाद्या चित्रपट वा वेबसिरीज यांच्या प्रमोशनसाठी तर करण्यात आली नसेल ना?
याच उत्तर मिळाल्याशिवाय खात्री पटणार नाही. कारण सिनेसृष्टीतले कपल्स शक्यतो इतक्या स्पष्ट स्वरूपात फार कमी वेळा आपलं प्रेम व्यक्त करताना पहायला मिळतात. आता आज व्हॅलेंटाईनच्या निम्मिताने खरी भानगड काय हे नक्कीच कळेल.
याशिवाय पुजाने प्रेमाची वाख्या माहित आहे का कोणाला? आणि सोबत “वेटफॉरटुमारो” असा हॅशटॅग वापरत एक पोस्टदेखील अपलोड केली आहे. या अशा प्रकारच्या गोष्टीने तर चाहत्यांमधील व रसिकप्रेक्षकांमधील सरप्राईजच्या गोष्टीची उत्सुकता अजूनच वाढवली आहे. गश्मिर महाजनी हा मराठीतला एक उत्कृष्ठ अभिनेता आहे.
दुसरीकडे पुजाने मराठीत अनेक कामे केली आहेत. भेटली तू पुन्हा, दगडी चाळ, वृंदावन, निळकंठ मास्तर यांसारख्या सिनेमांमधून पुजाने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पुजा सावंत सध्या गेल्या आठवड्याभरात तिच्या दररोजच्या इन्स्टाग्रामवरच्या घायाळ करणाऱ्या अदाकारीतल्या फोटोंमुळे चर्चत राहिली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!