वयाच्या 14 व्या वर्षी या मराठी अभिनेत्रीला सोनाली बेंद्रेकडून हिंदी रिऍलिटी शोमध्ये मिळाले होते खास गिफ्ट, कारण ती…
सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी एक उत्तम नृत्यांगना आहे हे आपल्या सर्वच रसिक प्रेक्षकांना माहितीच आहे. लहानपणापासून नृत्याची आवड असलेली प्राजक्ता आता रसिकांना अभिनेत्री, सूत्रसंचालक, निवेदक अशा विविध रुपात दिसते.
प्राजक्ताच्या नृत्याचा प्रवास हा लहानपणी एका प्रसिद्ध रिएलिटी शोमधून झाला होता. क्या मस्ती क्या धूम या लहान मुलांच्या कार्यक्रमात प्राजक्ता दिसली होती. विशेष म्हणजे त्याकाळी या कार्यक्रमात बॉलीवूडमधील मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सूत्रसंचालक होती.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. हा एक हिंदी रिऍलिटी शोमधील व्हिडिओ आहे.
या व्हिडीओत अवघ्या १४ वर्षे वयाची प्राजक्ता पाहायला मिळतेय. याशिवाय या कार्यक्रमाची होस्ट सोनाली बेंद्रे आणि मॉडेल व बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया देखील आहे. प्राजक्ताच्या हाती अगदी अचनाकपणेच हा जुना व्हिडीओ लागला आणि प्राजक्ताने नुकताच तो तिच्या लहानपणीची ही खास आठवण म्हणून शेयर केला.
View this post on Instagram
आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्ट मध्ये प्राजक्ताने लिहिलेय की, “काही गोष्टी डिलीट करत असताना बघा मला काय सापडलं. माझ्या यंग वर्जनला भेटा. वय १४ असावं. जी क्या मस्ती क्या धूम या स्टार प्लसवरील कार्यक्रमात विजेती ठरली होती. “यावेळी मी पण मराठी मुलगी आहे हे कळल्यावर, माझं नृत्य झाल्यानंतर मी दमलेय हे दिसल्यावर; सोनालीनं मला एक चॉकलेट दिलं होतं.”
प्राजक्ता या व्हिडिओत खूपच क्यूट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तसेच ती एक खूप चांगली नर्तिका असल्याचे तिने बालवयातच सिद्ध केले होते असे देखील त्यांचे म्हणणे आहे. प्राजक्ताने हा व्हिडीओ शेयर करून ही खास आठवण शेयर केली आहे. प्राजक्ताचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मराठी मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
ती तिचे कुटुंबियांचे फोटो, शूटिंगच्या वेळचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. लवकरच प्राजक्ता आणि मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीचा “लक डाऊन” हा नवीन चित्रपट येतोय. त्या विषयी नंतर बोलूच आपण…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.