“तुझं माझं जमतंय” मधील पम्मी खऱ्या आयुष्यात आहे एक यशस्वी उद्योजिका, यशस्वीपणे संभाळतेय “हे” उद्योग…

देवमाणूस मालिकेतील मंजुळा आणि आता तुझं माझं जमतंय मधील पम्मी साकारणारी मराठमोळी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव ही प्रत्यक्ष आयुष्यात फक्त एक अभिनेत्रीच नाही तर आहे एक यशस्वी उद्योजिकाही. एका प्रथितयश माध्यमाशी बोलतांना तिने स्वतःच हा खुलासा केला. यावेळी तिने अनेक गोष्टींवरही प्रकाश टाकला. जाणून घेऊया या मुलाखतीत प्रतीक्षा काय म्हणाली ते.

maharashtra times

‘छोटी मालकीन’, ‘मोलकरीणबाई’ या मालिकांनंतर प्रतीक्षा जाधवनं ‘देवमाणूस’ मालिकेत साकारलेल्या ‘मंजुळा’ भूमिकेचं कौतुक झालं. तिनं नुकतीच ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेत पम्मी या भूमिकेनं एंट्री केली. ती म्हणते की, ‘वाढलेल्या स्पर्धेमुळे मनोरंजनसृष्टीत प्रत्येकासाठी पर्याय तयार असतो. त्यामुळे मनोरंजनसृष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही’.

अपूर्वा नेमळेकरला काही कारणास्तव मालिका सोडावी लागल्यानं ‘पम्मी’ ही भूमिका प्रतीक्षाकडे आली. त्या विषयी ती म्हणाली, ‘अपूर्वानं पम्मीला ओळख मिळवून दिली. आता ती पुढे नेणं माझी जबाबदारी आहे. ही भूमिका स्वीकारताना माझी अभिनयशैली आणि पम्मी साकारण्याची ढब वेगळी असेल, हे मी स्पष्ट करतच भूमिका स्वीकारली. जेव्हा कुणी साकारलेली भूमिका तुमच्याकडे येते, तेव्हा तुलना आणि टीका अ’ट’ळ असते.

READ  मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सुरु केलाय नवीन व्यवसाय, जाणून घ्या कोणता आहे तिचा नवीन व्यवसाय...

dAiCMsN3Ux9zJnivwZXjQCDEZeLgmM7NN01h8Q5iflrLW K9jwO76jOfgeM6gazFwnnoby8f1wLnvw=w604 h453 no

ही भूमिका साकारण्याचं आव्हान मला आवडलं; कारण मी आधी साकारलेल्या मंजुळापेक्षा पम्मी फारच वेगळी आहे. या भूमिकेच्या अभ्यासासाठी मी बॉलिवूडच्या करिना कपूर, राणी मुखर्जी यांचे व्हिडीओ पाहिले. माझे सहकलाकार आणि टीम खूप प्रेमळ आहे. आम्ही नगरमध्ये शूटिंग करतोय; पण या मालिकेची टीम ही आता कुटुंबाचा भागच झाली आहे.’

स्वतःच्या अभिनय प्रवासाविषयी बोलतांना प्रतीक्षा म्हणाली की, “पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट, ज्युदो खेळाडू, नृत्य, कॉलेज उपक्रमांसाठी पत्रकारिता, एएफएमसीची परीक्षा देणं, हे सगळं करताना मी सहजच सुमित म्युझिकसाठी काम केलं आणि त्यानंतर सह्याद्री वाहिनीवर मालिका मिळाली. पुढे महेश मांजरेकरांचं एक नाटक आणि इतर नाटकांतून रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. नंतर मग मालिकांकडे वळले. यश, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. मनोरंजनसृष्टी ही कधीच कुणासाठी थांबत नाही. इथं संधींचा योग्य वापर करून घेणं जमायला हवं.”

actress pratiksha jadhav 1

स्वतःच्या यशस्वी उद्योजकतेबद्दल सांगतांना ती म्हणाली की, “अभिनयासह माझे स्वतःचे हेअर सलून, ब्यूटी इन्स्टिट्यूट आणि कन्स्ट्रक्शन असेही इतर उद्योग असून एक महिला उद्योजिका म्हणूनही माझं काम सुरूच आहे.” ती पुढे म्हणते की, “सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवायला कलाकार धडपडत असतात. उत्तम फॅनफॉलोइंग असूनही मला त्याची गरज वाटत नाही.

READ  "हा" प्रसिद्ध मराठी अभिनेता साकारतोय 'दख्खनचा राजा ज्योतिबाची' भूमिका, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सोशल मीडियावर तुम्ही आहात, तुम्हाला भरमसाठ फॉलोअर आहेत म्हणून तुम्हाला काम मिळतं का? मला वाटतं त्यापेक्षा कामातून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. सोशल मीडिया गरजेपुरता बरा आहे. तुमचं वैयक्तिक आयुष्य हे तसंच राहायला हवं. मला माझ्या आयुष्यातला खासगीपणा जपणं महत्त्वाचं वाटतं. लॉ’क’डा’उ’न’मध्येही सोशल मीडिया वगळून मी नात्यांना वेळ देणं, ध्यानधारणा, योग याकडे लक्ष दिलं. मालिका हे माध्यम मला मनापासून आवडतं आणि म्हणूनच मी त्यात रमले आहे. रंगभूमी हे प्रत्येक कलाकराचं स्वप्नं असतं; मात्र ते किंवा चित्रपटांपेक्षा मालिका ही माझी पहिली आवड आहे. रोज काम असणं आणि भूमिकेचे विविध पैलू आजमावण्याची संधी, हे त्याचं कारण आहे.’

Devmanus 8

मनोरंजनसृष्टीतल्या असुरक्षित वातावरणाबद्दल विशेषतः नव्या मुलींना काम मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड या मुद्द्यावर प्रतीक्षा ठामपणे तिचं मत मांडते. ती म्हणाली, ‘आज कुठलं क्षेत्र मुलींसाठी सुरक्षित आहे? ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या घटना चव्हाट्यावर येतात, त्यांचा गवगवा होतो म्हणून या क्षेत्राला सर्वाधिक नावं ठेवली जातात.

READ  'पाहिले न मी तुला' मालिकेतील मानसी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल...

खरं तर प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात काही घटना घडत असतातच. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कोणत्या वर्तुळात वावरता आणि तुमच्या मतांवर किती ठाम राहता, यावर सगळं अवलंबून असतं. सुरुवातीला या क्षेत्रात यायला मलाही विरोध झाला; मात्र आता पाठिंबा मिळतोय. पालकांनी मुलींना प्रोत्साहन द्यायला हवं.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment