‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील ‘गंगी’ 14 वर्षानंतर दिसते अशी, जाणून घ्या आज काय करते ही अभिनेत्री…

“गाढवाचं लग्न” हा सिनेमा तुम्ही पाहिला आहात का? मग तर तुम्हांला या मधील अभिनेता मकरंद अनासपुरे सोबत त्याच्या पत्नीची भूमिका निभावलेली गंगी आठवते का हो…. अहो हो, तीच गंगी जिच्या नॉनस्टॉप बोलण्याने सर्व प्रेक्षक लोटपोट होऊन हसतात.

Yeda perla ani khula ugavla blank

गंगीची अप्रतिम सुरेख भूमिका करणारी अभिनेत्री राजश्री लांडगे हिला तर आपण आजही विसरलो नाही. “गाढवाचं लग्न” हा चित्रपट आठवला तरी ती गोर्यापान रंगाची, नाजूक बांध्याची, कंबर कसून कचाकच काम करणारी आणि बचाबचा भांडणारी ती गावरान “गंगी” आपल्या नजरेसमोर येते.

आपल्या करियरच्या कारकीर्दीत राजश्री लांडगे हिला नामांकित अभिनेता मकरंद अनासपुरे याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिने या संधीचे सोने करत स्वतःचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात कमावले. त्यामुळे “गाढवाचं लग्न” हा चित्रपट सुपरहीट झाला. मात्र त्यानंतर गंगी पुन्हा कोणत्या सिनेमात दिसली नाही.

READ  शिवचा या अभिनेत्री सोबत डान्स व्हिडीओ व्हायरल, म्हणून शिव ठाकरे आणि विना जगतापचा झाला ब्रे'कअप ?

1grydturrtu

या चित्रपटातील तिची भूमिका संपूर्ण गावरान होती. त्यामुळे राजश्रीने तो कल अगदी व्यवस्थित पकडला. यासाठी तर तिचे संपूर्ण चित्रपटसृष्टीत भरघोस कौतुक देखील झाले. अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, राजश्रीला आपल्या खऱ्या आयुष्यात एकदम मॉडर्न राहायला आवडते. कारण हल्लीच तिचा मॉडर्न लुक सोशल मीडियावर खूप जोरदार वायरल होत आहे.

चित्रपट सृष्टीपासून दूर असलेली ही आपली गंगी म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगे ही “सिटीझन” या चित्रपटातून अभिनेत्री सोबतच निर्माता म्हणून पदार्पण करत, चित्रपटाची कथा आणि वेषभूषा सुद्धा सांभाळली होती.

117356693 135252048273388 3549352217706601613 o copy 47

यासाठी तिच्या कारकिर्दीची दखल घेत तिला “भारत गौरव पुरस्कार” म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच तिने या “सिटीझन” चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. पण या चित्रपटात मात्र ती एका ग्लॅमरस अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेता अंकुश चौधरीची आणि पत्नी दिपा परब यांची प्रेम कहाणी आहे खूपच रंजक, ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री राजश्री लांडगे हिचा जन्म पुण्यात झाला. अभिनयाची पार्श्वभूमी ही तिला घरातून तर अजिबात नव्हती. मात्र तिला अगदी लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. म्हणूनच तिने आपली अभिनयाची कित्येक स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत पाऊल ठेवले. सुरुवातीला तिने नाटकांत काम केले व त्यानंतर तिने “गाढवाचं लग्न” या चित्रपटातून आपल्या तुफानी अभिनयाने चाहत्यांचं हृदय जिंकलं.

117356693 135252048273388 3549352217706601613 o copy 48

राजश्री ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अभिनयासोबतच सामाजिक प्रश्नांवर काम करणे, त्यासाठी मदत करणे यावर देखील ती आघाडीवर असते. फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या “जलयुक्त शिवार” या योजनेसाठी देखील तिने खूप मदत केली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  मराठी सिनेसृष्टीतील अचानक ध'क्का देऊन जाणारे रिलेशनशिप ब्रेकअप, या मराठी अभिनेत्रीचे तर...

Leave a Comment