अभिनेत्री रेखाला तिच्या वडिलांनी मुलगी म्हणून कधीच स्वीकारले नाही, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…
अगदी आजही बॉलिवूडच्या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये असलेल्या रेखाच्या चाहत्यांमधे अजूनही कमी आलेली नाही, आजही रेखाची फक्त एक झलक पाहायला मिळावी म्हणून तिचे चाहते उत्सुक असतात. बॉलीवूड हिंदी चित्रपटसृष्टीसाठी रेखाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पण याच रेखाच्या आयुष्याला एक हळुवार दुखरी किनार आहे. ते म्हणजे तिचे वडील. साऊथचे सुपरस्टार जेमिनी गणेशन. रेखाचे तिच्या वडिलांशी कसे संबंध होते हे तुम्हाला माहिती आहे का?
ग्लॅमरच्या जगाविषयी आणि त्यात झळकणाऱ्या ताऱ्यांविषयी चाहत्यांच्या मनात नेहमीच काही प्रश्न असतात. प्रत्येकाला या स्टार्सच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते. खासकरुन सेलिब्रिटी मोठी आणि चर्चेत राहणारी असेल तर ही उत्सुकता आणखी तीव्र होते.
आपल्या कुटुंबातील लोकांशी या स्टार्सचा कसा संबंध आहे? हा प्रश्न चाहत्यांच्या यादीमध्ये नेहमीच शीर्षस्थानी राहिला आहे. असाच एक प्रश्नं प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि तिचे वडील जेमिनी गणेशन यांच्या बापलेकीच्या संबंधांबाबत चाहत्यांना पडलेला आ’ढ’ळू’न येतो.
रेखाचे वडील म्हणजे साऊथचे एकेकाळचे सुपरस्टार जेमिनी गणेशन. रेखाचे वडील रामास्वामी गणेशन हे त्यांच्या काळात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. आपल्या अभिनय कारकीर्दीसाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा ते सदैव आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असायचे.
सुरुवातीला रेखाचे वडील मद्रासमधील एका महाविद्यालयात के’मि’स्ट्री’चे लेक्चरर म्हणून काम करत होते, परंतु त्यांनी अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली. यानंतर, त्यांनी जेमिनी स्टुडिओमध्ये प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करण्यास सुरवात केली. हळूहळू जेमिनी गणेशन हे दक्षिण चित्रपट उद्योगातील एक मोठे प्र’स्थ बनले.
आधीचे दोन लग्न झालेले असूनही, जेमिनी गणेशन पुष्पावल्ली या अभिनेत्रीशी रिलेशनशिप मध्ये राहिले. दोघांना जी भानुरेखा नावाची मुलगी झाली तीच ही आत्ताची रेखा. असे असले तरीही आपल्या इतर दोन्ही (तशी जेमिनी गणेशन यांनी पुष्पवल्लीसह चार लग्ने केली होती.)
बायकांच्या मुलांप्रमाणे जैमिनी गणेशनने रेखाला मात्र कधीही स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला नाही. नुकतेच रेखा आणि जेमिनी गणेशनचे एक जुने छायाचित्र नव्याने समोर आले आहे. या छायाचित्रात रेखा तिच्या वडिलांसोबत बसली आहे कॅमेऱ्याला फोटोसाठी पोज देत आहे. अभिनेता कमल हासनसुद्धा या ब्लॅ’क अँड व्हाईट छायाचित्रात दिसत आहे. या चित्रात रेखाने साडी, बिंदी आणि झुम्का घातला आहे. या रूपातील जुन्या रेखाला पटकन ओळखणे फार कठीण आहे.
रेखा वडिलांवर खूप प्रेम करत असे. जैमिनी गणेशन यांनी सन २००५ सालीच ज’गा’चा नि’रो’प घेतला आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी रेखाला तिच्या वडिलांविषयी विचारण्यात आले होते की, ” तुमच्या वडिलांनी तुम्हाला कधीच मुलीचा दर्जा दिला नाही, मुलगी मानले नाही तर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या या वर्तणुकीविषयी वाईट वाटते का? त्याला उत्तर म्हणून रेखा म्हणाली की, “मला वाईट का वाटेल? मला माझे हे सुंदर जीवनच त्यांनी दिलेले आहे.
त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आज माझा अभिनय, माझी जीवनशैली व मी जी कोणी आहे, ती त्यांचीच देन आहे व त्याबद्दल मी त्यांची आजन्म आभारी आहे. रेखा पुढे म्हणाली की, “मला आनंद याच गोष्टीचा आहे की, मी त्यांच्यासोबत जो काही काळ व्यतीत केला, तो आम्हां दोघांच्याही आयुष्यातील क्वालिटी टाईम होता. ते सदैव माझ्या आठवणींमध्ये असतात. आणि तो आनंद त्यांच्या प्रत्यक्षात उपस्थिती इतकाच खास आहे व कायमच राहील.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.