अभिनेत्री रुपल नंद अडकली लग्नबंधनात… रिसेप्शनचे फोटो झाले व्हायरल….नवऱ्यासोबत दिल्या पोज..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो अलीकडे लग्नाचा सिझन भलताच ताव घेत आहे, म्हणून तर सामान्य लोक भरभर घरातील लग्न उरकत आहेत आणि सोबत सोशल मीडियावर अनेक सेलेब्सच्या लग्नाचा सुद्धा बँड ऐकू येत आहे. बॉलिवूड असो किंवा मग मराठी चित्रपट सृष्टी, अगदी सर्वत्र अनेक कलाकार लग्नबेडीत अडकत आहेत. त्यामुळे कधी आपण कल्पना सुद्धा केली नसेल अशा कलाकारांची प्रेमकहाणी आपोआप समोर येत असून ते लग्नबंधनात अडकून आपली लव्हस्टोरी पूर्ण करत आहेत.त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची भरपूर चर्चा सुरू असून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

या पावसात आता आणखीन एक मराठमोळी अभिनेत्री सुद्धा सहभागी झाली आहे. तिच्या नवऱ्या सोबतचे तिचे काही फोटो समोर आले आहेत, हे फोटो त्यांच्या रिसेप्शनचे आहेत. मित्रहो इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रुपलची ओळख असतानाही तिचा साधेपणा खूप काही मोहवतो. या रिसेप्शन मध्ये देखील तिने साधा मेकअप केला आहे, पण या मराठमोळ्या साज शृंगारात ती अतिशय सुंदर आणि खुलून दिसत आहे. तिचे हे फोटो बघता बघता विशेष लोकप्रिय झाले असून यावर अनेकांनी अप्रतिम कमेन्ट केल्या आहेत.

See also  अभिनेता आस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली लवकरच अडकणार लग्न बंधनात, पण लग्नाबद्दल घेतला मोठा निर्णय...

अभिनेत्री “गोठ” या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून पडद्यावर झळकली होती. या मालिकेतील रुपल नंदची भूमिका भरपूर प्रमाणात लोकप्रिय झाली होती, ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. मात्र तरीही रुपलने आता अगदी गुपचूप पद्धतीने अनिश कानविंदे या तरुणाशी लग्न केले आहे. अलीकडेच या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, अचानक रुपलला नवरीबाईच्या वेशात पाहून चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे. ही खबर ऐकून अनेकजण खूप खुश झाले आहेत.

सोशल मीडियावर रुपलच्या लग्नाच्या फोटोंसह तिच्या रिसेप्शनचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत. यामध्ये रुपलचा साधा मराठमोळा शृंगार नव्याने चाहत्यांची मने जिंकत आहे. अनेकांना ती या वेशात खूप आवडली आहे, म्हणून तर तिच्यावर लाईक्सचा वर्षांव मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय चाहते मंडळी खास कमेन्ट देखील देत आहेत. रुपल आणि अनिशची जोडी खूपच गोड आहे, फोटोमध्ये दोघेजण खूप छान दिसत आहेत. आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत, त्यामुळे सोशल मीडिया आणि सगळीकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत.

See also  मराठी अभिनेत्री सायली संजीववर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट...

अभिनेत्री रुपलच्या लग्नात काही मोजक्या पण लोकप्रिय कलाकारांनी हजेरी लावली होती, यामध्ये अभिनेता यशोमन आपटे देखील होता. रुपल एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिने “गोठ” मालिकेत राधाची भूमिका पार पाडली होती.या मालिकेतूनच तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. तसेच तिने “मुंबई पुणे मुंबई २” या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोतून अनिश आणि रुपल अतिशय लक्षवेधी ठरले आहेत. त्यांच्या आयुष्यात नेहमी असेच सुख येत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment