ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री देखील अडकली लग्नबंधनात… लग्नाला मराठी कलाकारांनी लावली हजेरी…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कलाकारांच्या लग्नाचा जल्लोष अजूनही सुरू आहे.  यावर्षी अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. या कलाकारांनी मनोरंजनाच्या दुनियेतीलच कुणी जोडीदार निवडला, तर कुणी आपल्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रातल्या जोडीदाराशी गाठ बांधली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव या मालिकेतील अमृता पवारच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री रूपल नंदनेही तिच्या लग्नाची घोषणा केली आहे.

रूपलने मुंबईच्या अनिश कानविंदेसोबत सप्तपदी घेतली आहे. रूपलने त्यांच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत आणि आता तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र रुपलच्या अचानक दिलेल्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसून आलं होतं. हळदी आणि मेहंदीसाठी रूपलचा खास लुक होता. रूपलचे लग्न कुटुंब, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडले.

See also  अभिनेत्री सायली संजीव हिच्या 'दाह' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर

श्रीमंता घरची सून या मालिकेतील नायक यशोमान आपटे हा सुद्धा तिच्या लग्नाला उपस्थित होता आणि त्याने देखील या लग्नातील काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात रूपल खूपच सुंदर दिसत होती. तिने हळदीसाठी पिवळी साडी नेसली होती.गोठ या मालिकेतून रूपल नंद राधाच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर आली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली.

actress rupal nand marrige photo 1

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या मुलीची ही भूमिका होती. त्यानंतर रूपलने श्रीमंतघरची सून मालिकेतील अनन्याची भूमिकाही प्रेक्षकांसमोर आणली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली, त्यामुळे रुपल ला एकापाठोपाठ चांगल्या भूमिका मिळत गेल्या. मुंबई पुणे मुंबई चित्रपटाच्या तिसऱ्या सीझनमध्ये मुक्ता बर्वेची बहीण म्हणून रुपलने साकारलेली भूमिका सुद्धा प्रेक्षकांना फार आवडली.

See also  'तू बायको म्हणून घरी आली पाहिजे' चाहत्याच्या कॉमेंटवर 'फॅन्ड्री' फेम अभिनेत्री राजेश्वरी खरातने दिले अजब उत्तर...

अगदीच मोजक्या भूमिकांसह रुपलने मनोरंजन विश्वात आपला चाहता वर्ग तयार केला आहे. रुपल अभिनेत्री म्हणून टीव्हीवर येण्याआधी एक डेंटिस्ट आहे. त्यामुळे डॉक्टर असूनही या क्षेत्राची आवड असल्याने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मूळची पुण्याची असलेल्या रूपलने श्रावणकवीन सौंदर्य स्पर्धेतून रुपेरी दुनियेत प्रवेश केला. सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा पुरस्कार रूपलला मिळाला, ज्याने नंतर रूपल साठी अभिनयाची दारे उघडली गेली. रुपल नंद हिला तिच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा…!

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment