‘श्रीमंताघराची सून’ मालिकेतील ही अभिनेत्री आहे तरी कोण? जाणून घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनय हा रगारगात ज्याच्या भरलेला आहे, तो खूप मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री होते. मराठी मध्ये एका लोकप्रिय मालिकेत काम करणारी ती अभिनेत्री आज खूप लोकप्रिय आहे. तिला घराघरात ओळखलं जातं. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मालिका कोणती आणि अभिनेत्री कोण ? तर चला मग जाणून घेऊयात.

Shrimantgharchi Soon Start Date Cast Story Schedule on Sony Marathi

गेल्या काही दिवसांपासून, एका मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. त्या प्रोमोज मधले चुरचुरीत आणि नेमके संवाद प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनले होते. मालिकाही अशीच मनोरंजक असावी अशी अपेक्षा होती आणि सध्या ती अपेक्षा पूर्ण होताना दिसतेय.

या मालिकेचं नाव आहे ‘श्रीमंता घरची सून’. या मालिकेतून रूपल नंद आणि यशोमान आपटे हे कलाकार आपल्याला पुन्हा एकदा या मालिकेच्यानिमित्ताने नायक आणि नायिका म्हणून भेटायला आले आहे. आज या निमित्ताने कलाकार मधील अभिनेत्री रुपल नंद हिच्या अभिनय कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात..

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...

78831227

याच सोबत तिला, एका मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळलं आणि तिने सहज म्हणून ऑडिशन दिली. त्यात तीची निवडही झाली. हीच तिची पहिली मालिका, जिने तिला महाराष्ट्राच्या घराघरात नायिका म्हणून ओळख मिळवून दिली. ‘गोठ’ असं या मालिकेचं नाव. यातील ‘राधा’ हि मुख्य व्यक्तिरेखा तिने साकारली होती. सोबत विलास हि नायकाची भूमिका साकारली होती समीर परांजपे ह्याने.

हि मालिका काही वर्षे चालली. यातील रुपलच्या व्यक्तिरेखेचं खूप कौतुक झालं. पुढे तिने ‘फुलपाखरू’ हि मालिका केली. यातील रेवती हि व्यक्तिरेखा तिच्या वाट्याला आली. तिने या भूमिकेतही स्वतःची अशी छाप सोडली. हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका होत्या. या नंतर आलेल्या अजून एका मालिकेत यशोमान आणि रूपल यांनी एकत्र काम केलं.

ea4676e9ebf59f2ca0225af9cf5db5c4

‘आनंदी’ असं या मालिकेचं नाव. या मालिकेत ‘आनंदी’ या विशेष मुलीची मोठ्या वयाची भूमिका रूपल हिने निभावली. या भूमिकेसाठी तिने तिचा अभिनय कारकीर्दीचा संपूर्ण अनुभव पणाला लावला. त्यामुळे तिचं या भूमिकेचंही कौतुक झालंच.

See also  अभिनेता वरुण धवनच्या गर्लफ्रेंडबद्दल काका अनिल म्हणाले असं काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही!

या मालिकेनंतर तिची सध्याची मालिका सुरु झाली, ती म्हणजे ‘श्रीमंता घरची सून’. या मालिकेत शांत, सुस्वभावी पण त्याचसोबत वाक्चातुर्य असणारी अशी अनन्या हि व्यक्तिरेखा रूपल साकारते आहे. या मालिकेच्या निमित्ताने सासूची बाजू घेणारी सून आपल्याला दिसणार आहे. अजूनही या मालिकेचे सुरुवातीचे दिवस असल्याने या मालिकेची कथा अजूनही उलगडते आहे.

124808643 148932330307607 7762174639109040782 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

मालिकांसोबतच तिने एक शॉर्ट फिल्मही केली आहे. ‘ब्लाइंड व्हिजन’ असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. रूपल हिचा अभिनय प्रवास हा एकांकिकांतून सुरु होऊन आजतागायत मालिका आणि सिनेमे करत अखंडपणे चालू आहे. तसेच विविध भूमिका करण्याकडेही तिचा कल दिसून येतो. तिचा एकंदर अभिनय प्रवास पाहता, तिने अभिनित केलेली प्रत्येक कलाकृती हि लोकप्रिय ठरली आहे. तसेच तिच्या स्वतःच्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांकडून वाखाणल्या गेल्या आहेत. यांमुळे ‘श्रीमंता घरची सून‘ हि मालिका आणि रूपल सकारात असलेली, ‘अनन्या’ लोकप्रिय होणार हे निश्चित.

See also  या मोठ्या कारणामुळे अभिनेत्री जुही चावलाने जगापासून लपवले होते आपले लग्न, 25 वर्षांनी केला ध'क्कादायक खुलासा...

सध्या कुटुंबातील विषयावर मालिका आणि आसपासचे पात्र खूप चालतायत. प्रेक्षकांना तेच पाहायला आवडतायत. अश्याच मालिकेत काम करणारी रुपल नंद ला तिच्या यशाचा हा सिलसिला या मालिकेप्रमाणेच येत्या कलाकृतींमध्येही सुरु राहो हि स्टार मराठी टीमकडून रूपल हिला शुभेच्छा !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment