‘बिग बॉस’ अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा आज जन्मदिवस, जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील नविन जोडीदाराबद्दल…
बिग बॉस मराठी सीजन १ संपल्यानंतर लोकप्रिय मालिका ‘हे मन बावरे’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हीचा आज वाढदिवस, २२ एप्रिल १९८४ मध्ये मुंबईत जन्मलेली शर्मिष्ठा आपल्या अभिनयाने खूप प्रसिद्ध आहे. शर्मिष्ठाच्या अभिनयाची सुरवात शाळेत असताना ७ वीच्या वर्गापासून झाली तिने त्यावेळी आपल्या छोट्या वयापासूनच नाटकात काम करण्यास सुरुवात केली.
तिला अभिनयाबरोबर नृत्याची देखील आवड आहे म्हणून तीन भरतनाट्यमचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे. तिचा जन्म मुंबईत ठाण्यात झाला, पण नंतर वडिलांच्या कामामुळे त्यांना नाशिकमध्ये शिफ्ट व्हावं लागलं.
नाशिकमध्ये असताना तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम मध्ये पूर्ण केले तिथे तिने बी. कॉमची पदवी मिळवली, पुढचं शिक्षण घेण्यासाठी कमिन्स कॉलेजमध्ये एमबीए केलं तिच्या कॉलेज जीवनात तिने अभिनयाची आवड जपण्यासाठी स्वप्नागंधा थिएटर मध्ये जॉईन केलं. इथून तिचा प्रवास खरा सुरू झाला…
तिची चाहत्यांनमध्ये आवडलेली सर्वात चांगली भूमिका म्हणजे ‘मन उधान वाऱ्याचे’, मधील नीरजा नंतर ती खूप साऱ्या मालिकांमध्ये काम करत गेली. बिग बॉस सिझन १ मध्ये सहभाग घेतला, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की शर्मिष्ठा टेलिव्हिजन वरचा सुप्रसिद्ध चेहरा असून सुद्धा तिला थिएटरमध्ये काम करायला जास्त आवडत.
ती म्हणते की ह्यातून मला खरं समाधान मिळत. मागील वर्षी शर्मिष्ठाचा विवाह सोहळा संपन्न झाला. शर्मिष्ठाने यापूर्वी आणि एक लग्न केलं होतं याबद्दल खुलासा तिने बिग बॉस सिझनमध्ये केला होता, शर्मिष्ठाचा पहिल लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकार हिचा भाऊ अमेय निपाणकार सोबत झाला होता पण हा त्यांचा संसार काही कारणास्तव ठिकू शकला नाही.
खरं तर शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेमविवाह झाला होता. हे लग्न त्यांनी घरच्यांच्या परवानगीने केलं होतं शर्मिष्ठा म्हणते की, कधी कधी काही निर्णय चुकतात तसाच लग्नाचा निर्णय माझा चुकला अस तिने बिग बॉस शो मध्ये म्हंटल. शर्मिष्ठा अस देखील म्हणते की घटस्फोटानंतर मी मानसिक तणावातून गेले आहे.
या अश्या प्रसंगामुळे तिने सिनेसृष्टीमधून काढता पाय घेतला होता, ‘जुळून येती रेेशीम गाठी’ या मालिकेत शर्मिष्ठानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण ह्या सगळ्यातून सावरून ती पुन्हा लग्नात अडकलीये तिने माहितीनुसार तेजस देसाई सोबत लग्न केलं आहे.
या बाबत मागील वर्षी २०२० मध्ये खूप चर्चा रंगल्या होत्या, शर्मिष्ठा म्हणली की हे अरेंज मॅरिज जरी असलं तरी माझ्यासाठी लव्ह मॅरिज आहे शर्मिष्ठा आणि तेजस देसाईची ओळख तिच्या बहिनीने सुप्रियाने करून दिली होती. मागील वर्षी तेजस देसाई आणि शर्मिष्ठा राऊत लग्नगठबांधनात अडकलेत, मागील वर्षी ११ ऑक्टोबरला त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. शर्मिष्ठा ही मराठी मध्ये लाभलेली उत्तम अभिनेत्री आहे तिच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्त तिला खूप साऱ्या शुभेच्छा!
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.