‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात सलमान खानच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्रीचे झाले निधन…
बॉलीवुड सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे दुःखद नि’ध’न झाले आहे. शशिकला यांनी आपल्या वयाच्या 88 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांची शोकसभा मुंबईत कुलाबा येथील चर्चमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त सांगितले जात आहे. दिग्गज, नामांकित अभिनेत्री शशिकला यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण सिनेजगतावर शो’क’क’ळा पसरली आहे.
आपल्या करियरला सुरूवात केल्यापासून त्यांनी एक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारताना शशिकला या खलनायिका म्हणून नावारूपास यायच्या. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात त्यांचा जन्म एका उच्चश्रीमंत घराण्यात झाला होता.
त्यामुळे शशिकला ह्या लहानपणापासूनच आलिशान आयुष्य जगत आल्या. आपल्या बालपणापासूनच त्यांना अभिनयाची व नृत्याची खूप आवड होती. माहेरी शशिकला जवळकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आपल्या सासरी आल्यावर मात्र शशिला सैगल झाल्या.
अभिनेत्री शशिकला यांनी 1947 मध्ये प्रदर्शित झालेल्या “जु’ग’नू” या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. परंतु त्यानंतर त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी बरेच अथक परिश्रम घ्यावे लागले. पुढे 1962 मध्ये “आरती” या चित्रपटात एक नकार भूमिका करण्याची संधी शशिकला यांना मिळाली.
मात्र आपल्या या नकारात्मक भूमिकेनंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कधीही काम न करण्याचे ठरवले. पण अखेर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्यांच्या भूमिकेसाठी योग्य प्रकारे समजूत काढून त्यांना शेवटी पुन्हा काम करण्यास तयार केले.
परंतु शशिकला यांच्या आरती या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्यामुळेच त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. त्यासाठी शशिकला यांना “फिल्मफेअर” सारखे अनेक भव्यदिव्य पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर त्यांची करियरची वाटचाल ही भ’र’धा’व वेगाने सुरू झाली.
इंडस्ट्रीमध्ये शशिकला यांनी हरियाली और रास्ता, गुमराह, फुल और पत्थर, हमराही यांसारख्या अनेक चित्रपटांत खलनायिका म्हणून उत्कृष्ट भूमिका निभावल्या. ओम प्रकाश मेहरा यांसोबत अभिनेत्री शशिकला यांनी प्रेमविवाह केला होता. तर या दाम्पत्याला दोन सुंदर मूली आहेत. स्टार मराठी परिवारातर्फे सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांना भावपूर्ण श्रद्धांजली.