“या” मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केला आहे स्वतःचा एक अनोखा बिजनेस, काही दिवसांपूर्वीच ती सर्वांकडे कामाची विनवणी करत होती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने काही दिवसांपूर्वीच काम मिळावे, यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत माझ्याकडे काहीच काम नाही व मला कामाची गरज आहे, असे सांगितले होते. परंतु तिच्या या पोस्टची मात्र कुणीही दखल घेतली नाही. मात्र आता याच अभिनेत्रीने स्वतःचा एक वेगळा बिजनेस सुरू केला आहे.

“बालक पालक” या चित्रपटातून अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर ही सर्वांच्या घरात पोहोचली. तसेच सिंधू या मालिकेतील तिच्या कामाचे भरपूर कौतुक झाले. तसेच तिच्या परी व चाहूल या मालिका सुद्धा चाहत्यांच्या भेटीस आल्या. मागील वर्षी 17 ङिसेंबर 2020 रोजी शाश्वतीने फोटोग्राफर आणि इंटेरियर ङिजाइनर असलेल्या करमरकर सोबत लग्न केले.

See also  जेव्हा अभिनेत्री सनी लियोनी बोलते चक्क मराठी, ऐकूनच लावाल तुम्हीपण डोक्याला हात...

लग्नानंतर ती आपला पती राजेंद्र करमरकर सोबत कोथरूड मध्ये स्थायिक झाली. काही दिवसांपूर्वीच शाश्वती पिंपळीकर हिने “माझ्याकडे काम नाही. मला चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशाप्रकारे कोणत्याही माध्यमातून काम करण्याची माझी तयारी आहे, अशी तिने पोस्ट शेयर केली होती. पण तिच्या या पोस्टची कुणीच दखल घेतली नाही.

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का बरं अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर ही आता अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचे वेगळे करियर घडवू पाहत आहे. “मुदपाकखाना” या नावाने ती स्वतःचा बिजनेस सुरू करत आहे. कोथरूड परिसरात कोणतीही पार्टी असो किंवा एखादे फंक्शन असो, अशा प्रत्येक ऑर्डर तुम्ही मुदपाकखान्यात करू शकता.

येथे तुम्हांला महाराष्ट्रीयन, पंजाबी तसेच इतर ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही निरनिराळे पदार्थ मागवू शकता, असे अभिनेत्री शाश्वतीने सांगितले आहे. त्याचप्रमाणे पार्टी ऑर्डर सोबतच येत्या 31 जुलैपासून दर शनिवार आणि रविवार एक फिक्स असा मेन्यू ठेवण्यात येईल, असे शाश्वतीने सांगितले आहे. या कामात तिला तिच्या नवर्याने देखील खूप मोठी मदत केली आहे.

See also  मराठी अभिनेत्री अश्विनी भावेचे अमेरिकेतील आलिशान घर पाहिले आहे का? घराचे फोटो पाहून थक्क व्हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment