“तू तेव्हा तशी” फेम अनामिका माहितेय ना ?…..तिच्या पतीला पाहिलं का….करतो हे काम..
मित्रहो झी मराठी वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत, या मालिकांच्या नवनव्या कथानकाने खूप मनोरंजन होत आहे. यातून अनेक नवीन जुन्या कलाकारांची खास भेट होत आहे त्यामुळे प्रेक्षक मंडळी या मालिका रोज पाहण्यासाठी आतुर असतात. शिवाय यातील रोज नवे सिन कथा आणखीन खुलवतात. अशीच एक मालिका जिने अल्पावधीतच “तू तेव्हा तशी” भरपूर गाजली आहे. मालिकेत सौरभ आणि अनामिकाची आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळते. दोघांची जोडी मालिकेला छान आकार देते.
यातील शांत समंजस सौरभ तर सर्वानाच आवडतो, तसेच निडर आणि बिनधास्त अनामिका देखील दिवसेंदिवस लोकांच्या मनात घर तयार करत आहे. ही भूमिका मराठी अभिनेत्री शिल्पा तुळसकर हिने साकारली आहे, या मालिकेत काम करण्याआधी तिने डोंबिवली फास्ट, भातुकली, हद कर दी आपने, हिरो, सोहळा, तुला पाहते रे, यांसारख्या सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी मालिकेतून पडद्यावर एन्ट्री घेतली होती. प्रत्येक भूमिकेत ती नव्याने उमगली होती, म्हणून तर अनेकांना ती खूप आवडते.
शिल्पा एक सुंदर उत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच तिची पर्सनल लाईफ देखील खूप काही जाणून घेण्यासारखी आहे. तिच्या आयुष्यातील खरा सौरभ १९९३ मध्ये नवरा बनून तिच्या आयुष्यात आला. चार्टड अकाउंट असलेल्या विशाल शेट्टी सोबत तिने लग्न केले आहे, या गोड दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. विशाल हा शेट्टी टाटा या कंपनी मध्ये सीए म्हणून कार्यरत आहे. विशाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, अनेकदा आपल्या फॅमिली सोबत फोटो काढून तो शेअर करत असतो.
शिल्पा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे आणि विशालचे फोटो पाहून त्यांचे सर्व चाहते खूप छान छान कमेन्ट करत असतात. शिल्पाची नवी भूमिका अनामिका प्रचंड लोकप्रिय होत आहे, पडद्यावर तिला या वेशभूषेत पाहण्यासाठी लोक खूप आतुर असतात. ही कथा दोन जुन्या प्रेमींना नव्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवते, अनेक जुन्या आठवणी ताज्या करते व त्यामुळे प्रेमाचा बहर हळूहळू उमलत जातो व दोघेही पुन्हा पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात.
मित्रहो ही मालिका प्रेक्षकांना खूप गुंतवून ठेवते, म्हणून तर बघता बघता याची क्रेझ वाढत चालली आहे. लोक ही मालिका खूप आवडीने पाहत आहेत. त्यामुळे अनामिका देखील त्यांची आवडती भूमिका होत आहे, ती अशीच लोकप्रिय होत राहो ही सदिच्छा. शिल्पाला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.