अभिनेत्री शिवानी दांडेकर आणि फरहान अख्तर अडकणार लवकरच विवाहबंधनात, अखेर ठरला विवाहाचा मुहूर्त…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

इंङस्टीमध्ये फरहान अख्तर हे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. लवकरच फरहान हे मराठमोळी मॉडेल शिवानी दांडेकर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. बहुतांश काळापासून हे कपल रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. परंतु या दोघांनीही कधीच आपले रिलेशन जगापासून लपवले नाही. फरहान आपली पत्नी अधुनापासून दोन वर्षांपूर्वीच विभक्त झाला. त्यानंतर त्याच्या आणि शिवानी च्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आले.

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या रिसेप्शन पार्टीच्या वेळी ही जोङी पहिल्यांदा एकत्रित माध्यमांसमोर आली. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली. तर आता लवकरच हे कपल विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी त्यांनी मार्च महिन्याचा मुहूर्त निवडला होता. परंतु आता त्यांनी आपला निर्णय बदलला असून फरहान च्या वाढदिवसाच्या दिवशी ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे म्हटले जाते.

See also  कतरिनाची मराठमोळी जाऊबाई आहे तिच्यापेक्षाही अधिक बोल्ड व ग्लॅमरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटोज्

मीडिया रिपोर्टस् नुसार ते दोघेही लवकरच आपल्या लग्नाची अधिकृतपणे घोषणा करतील. 9 जानेवारी रोजी ते आपल्या लग्नाच्या घोषणेविषयी सांगतील, असे म्हटले जाते. कारण या खास दिवशी फरहान अख्तर चा 48 वा वाढदिवस आहे. याआधी फरहान व शिवानी यांनी 2022 मधील मार्च महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. हे कपल आपल्या लग्नात सब्यसाची यांनी ङिजाइन केलेल्या आऊटफिट मध्ये दिसतील, अशी माहिती मिळाली. मात्र अजूनतरी या कपल कङून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

शिवानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. टाईमपास या मराठी चित्रपटात “साजूक तुपातली पोळी” या गाण्यात दिसलेली शिवानी ही एक मॉडेल तर आहेच. त्याचसोबत ती अभिनेत्री आणि गायिका सुद्धा आहे. फरहान व शिवानी यांची लवस्टोरी 2018 पासून सुरू झाली.

See also  काय म्हणावं बरं आता! अभिनेत्री असूनही सासरी 'असं' राहावं लागतं अभिनेत्री कतरिना कैफला, पहा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment