‘तारक मेहता…’ शो मध्ये दया भाभींच्या जागेवर होणार या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध शो आहे. कारण या शो मधील सर्व कलाकार हे अतिशय दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. म्हणून तर या शो मधील प्रत्येक कलाकार हा आपल्याला सर्वांना आवडतो. अगदी त्याचप्रमाणे एकीकडे ह्या शो मध्ये सर्व फॅन्स गरबा क्वीन “दया” भाभी यांची एन्ट्री होण्याची वाट पाहत आहेत. कारण त्यांच्याविना हा शो म्हणजे जसा की बिन साखरेचा चहा.
मीडिया रिपोर्टस् नुसार लवकरच असित कुमार मोदी हे आपल्या शो मध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री करणार आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मधील मसाला कटेंट वाढवण्यासाठी ते नवीन अभिनेत्रीला या शो चा हिस्सा बनवणार आहेत.
त्यामुळे आता लवकरच आपल्या सर्वांच्या या फेवरेट शो मध्ये एक धमाकेदार एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता हा येणारा नवीन चेहरा सुद्धा दया भाभींसारखेच निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
मीडियाच्या माहितीनुसार “परमावतार श्रीकृष्ण” या कार्यक्रमातील अभिनेत्री ‘सोनी पटेल’ ही तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये एन्ट्री करणार आहे. या अभिनेत्रीच्या एन्ट्रीनेच एक अफलातून ट्विस्ट आपल्याला शो मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्या फेवरेट शो मध्ये सोनी पटेल हिची एन्ट्री खूपच महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे.
हो, पण हे देखील तितकंच खरं आहे की अजूनपर्यंत या एन्ट्रीसाठी सोनी पटेल हिची कोणतीच रिएक्शन आलेली नाही. त्याचप्रमाणे तिने ऑफिशियली सुद्धा काहीच माहिती दिली नाही. मात्र तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेयर केली आहे.
तिच्या या पोस्ट मध्ये “तारक मेहता….” मधील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी दिसत आहेत. अभिनेते दिलीप जोशी यांच्यासोबत अभिनेत्री सोनी पटेल हिने आपला एक फोटो शेयर केला होता. तर याच फोटोमध्ये TMKOC मधील पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक हे सुद्धा दिसत आहेत.
जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की, “तारक मेहता..” या शो मध्ये दयाबेन यांना खूपच ङिमांङ होती. त्यामुळे सोनी पटेल हिच्या एन्ट्रीमुळे आता दिशा वकानी हिची कमी काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
तसेच दिशा वकानी हिचे फॅन्स सोशल मीडियावर ती शो मध्ये रिएन्ट्री केव्हा करणार, असे प्रश्न अजूनही विचारत आहेत. TMKOC या प्रसिद्ध शो मध्ये दयाभाभींची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही शो मधून केव्हाच निघून गेली, पण तरीही ती आजही चर्चेत असते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.