अभिनेत्री सनी लियोनी आपल्या दत्तक मूलीवर करते खूप अन्याय, अखेर सत्य आले समोर
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी ही आज तीन मुलांची आई आहे. सनीच्या दोन्ही मुलांचा सरोगसीतून जन्म झाला असून मूलगी निशा हिला सनीने दत्तक घेतले आहे. सनी आपल्या मुलांच्या अतिशय जवळ आहे. कित्येकदा ती त्यांच्यासोबत मस्ती करतानाचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते. हल्लीच सनी मुंबईतील रस्त्यावर आपल्या तीन मुलांसह दिसली. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
या कारणाने झाली सनी ट्रोल :
ट्रोलर्सचे म्हणणे आहे की, सनी जेव्हा मुलांसोबत फिरायला जाते, तेव्हा ती नेहमी आपल्या दोन मुलांचा हात धरताना दिसते. सनीने आपली मूलगी निशा हिचा कधीच हात धरला नाही. इतकंच नव्हे तर तिने निशाला फक्त प्रसिद्धीसाठी दत्तक घेतल्याचे म्हटले जाते. त्यांच्या मते ती आपल्या जुळ्या मुलांना वेगळी वागणूक देते. मात्र ती दत्तक घेतलेल्या निशाची काळजी घेताना दिसत नाही.
या संपूर्ण ट्रोलिंगवर आता सनीचा पती ङॅनियल वेबरने एका मुलाखतीत म्हटले की, हा सगळा केवळ एक मूर्खपणा आहे. मला याविषयी काहीच बोलायचे नाही. लोक काय विचार करतात, याचे मला काही देणंघेणं नाही. माझी मुलं ही फक्त तीन वर्षांची आहेत. त्यांना रस्त्यावर नीट चालता येत नाही. तर माझी मुलगी निशा ही 6 वर्षांची आहे व तिला रस्त्यावर कसे चालायचे, हे बऱ्यापैकी माहित आहे.
ङॅनियल पुढे म्हणाला की,”निशा ही माझ्या घरची राजकुमारी आहे. लोकांची अशी विचारसरणी असेल, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सनी लियोनी आणि तिचा पती ङॅनियल यांनी महाराष्ट्रातील लातूर येथील अनाथ मुलांच्या आश्रमातून निशाला दत्तक घेतले. त्यावेळी निशा फक्त 21 महिन्यांची होती. त्यानंतर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी दोन मुलांची आई झाली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.