या अभिनेत्रीचा मुलगा चालवतो पाव भाजीचे हॉटेल… अभिनयाच्या मागे न लागता निवडला हा मार्ग…
मित्रहो मराठमोळ्या कलाकारांना अनेकजण पसंत करतात, त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रचंड लोकप्रिय असतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांची मुले आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमवताना दिसतात, त्यांच्यातील कला पाहून लोक अगदी थक्क होतात. आपल्या आई वडीलांपेक्षा देखील त्यांच्या मध्ये अनेक गुण आहेत त्यामुळे मुलांना पडद्यावर अभिनयाची झलक दाखवताना पाहून पालक खूप आनंदी होतात. मात्र मराठी चित्रपट सृष्टी याला अपवाद होत आहे, कारण रंगभूमीवर गाजलेल्या कलाकारांची मुले आपले करिअर नवनवीन क्षेत्रात आजमावत आहेत.
आज आपण अशाच एका मालिकेबद्दल जाणून घेणार आहोत जिच्या मुलाने स्वतःच्या करिअर साठी एक खास आणि उत्कृष्ट मार्ग निवडला आहे. स्टार प्रवाह वरील मालिका “ठिपक्यांची रांगोळी” फार कमी वेळात भरपूर गाजली आहे मालिकेतील प्रत्येक भूमिका विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच टीआरपी स्पर्धेत टॉप ५ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या लोकप्रियतेची पकड अगदी मजबूत ठेवली आहे. म्हणून तर अनेकजण खूप मनापासून यातील भाग पाहत असतात.
या मालिकेत माईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे हिने साकारली आहे, पडद्यावर आता तिला माधवी कानिटकर या नावाने सर्वजण ओळखतात. तिच्या या भूमिकेला अनेकांनी खूप पसंत केले आहे. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका पार पाडल्या आहेत. तिची प्रत्येक भूमिका काहीतरी खास करुन दाखवते, मनाला भुरळ घालत असते. सतत रडणाऱ्या भूमिकेपेक्षा तिने विनोदी आणि खलनायिका भूमिका निवडल्या. म्हणून तर अनेकांनी तिच्या या निवडीला नेहमीच प्रेम बहाल केले आहे.
आजवर तिने “फु बाई फु”, “जागो मोहन प्यारे”,” मोलकरीणबाई” , “श्रीमंताघरची सून” , “ची.व ची.सौ.का”, “बाळकडू” यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रिया पाठारे हिने निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत, मराठी चित्रपट सृष्टीला तिने भरीव योगदान दिले आहे. सोशल मीडियावर देखील सुप्रिया खूप सक्रिय असते, मात्र ती कधी जास्त आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसली नाही. त्यांचं बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करत तिने आर्थिक हातभार लावला.
आयुष्यातील हा बराच कठीण काळ मागे लोटला आहे, लहान बहीण अर्चना नेवरेकर आणि सुप्रिया दोघीनीही हलाखीच्या परिस्थिती मधून स्वतःला स्थिरस्थावर बनवले. अभिनय क्षेत्रात दोघींची खास ओळख आहे, मात्र असे असले तरीही तिचा मुलगा मिहीर पाठारे याने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपट सृष्टीत न येता निराळा मार्ग निवडला आहे. मिहीर हा एक उत्तम शेफ आहे, संजीव कपूर यांच्या “खाना खजाना” शोमध्ये त्याने सहभाग घेतला होता. शिवाय काही काळ अमेरिकेत सुद्धा तो शेफ म्हणून कार्यरत होता. आता तो मायदेशी परतला आहे, आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे.
त्याच्या हॉटेलचे नाव “मharaj” असे नाव आहे, इथे सर्व खवय्यांना मिहीरच्या हातची खास पावभाजी खायला मिळणार आहे. त्याचा हा व्यवसाय भरभराटीला येवो ही सदिच्छा. त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.