‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील मानसी नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल…

मित्रांनो!, अनलॉक झाल्यानंतर अलीकडच्या काळात पुन्हा काही नवनवीन मराठी मालिका आपल्या भेटीस येण्यास सुरुवात झाली आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं तर तिसरं पर्व आपल्या भेटीस आलं आहे. नुकतेच काही दिवस आधी अजून एक मालिका झी मराठी वरून आपल्या भेटीस आली. आणि अतिशय अल्पावधीतच लोकप्रिय होतांना दिसत आहे.

Untitled design 2021 02 24T180409.848

‘पाहिले न मी तुला’ हीच ती मालिका. मराठी इंडस्ट्रीतील मोठे नाव महेश आणि आदिनाथ कोठारे निर्मित या मालिकेतून आजवर नायक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर आपल्याला पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय. याउलट आशय कुलकर्णी हा लोकप्रिय खलनायक आता चक्क नायकाच्या भूमिकेत दिसतोय. त्यामुळे या लोकप्रिय अभिनेत्यांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांची जुगलबंदी मराठी रसिकांना पाहायला मिळत आहे.

READ  'अग्गं बाई सासूबाई' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले नि'धन, संपूर्ण सिनेसृष्टीवर पसरली शो'क'क'ळा...

या दोन तगड्या कलाकारांच्या सोबतच अजून एक नवीन चेहरा या मालिकेमधून आपलं लक्ष वेधून घेतोय. आणि हा चेहरा आहे मानसीचा, म्हणजेच नायिकेचा. तन्वी मुंडले ही अभिनेत्री या मानसीची गोड भूमिका साकारत आहे. तशी तन्वीची ही पहिलीच मालिका असली तरी तिने इतरही अनेक कलाकृतींतून अभिनय केलेला आहे. त्याविषयी जाणून घेऊया…

125194958 393862231960994 8231515156404398962 n

तन्वी मूळची कोकणातील कुडाळची. बहुतांश कोकणी माणसांप्रमाणे तिलाही अभिनय आणि कलेची प्रचंड आवड. तिने आपली अभिनयाची आवड आणि क्षमता ओळखली आणि या क्षेत्रातच आपण कारकीर्द घडवायचं ठरवलं.

तिने सर्वप्रथम शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने आपलं नाट्य प्रशिक्षण पुण्याच्या लोकप्रिय ललित कला केंद्रातून पूर्ण केलं. तिथे तिने अनेक नाट्यप्रयोगांमधून स्वतःमधील अभिनेत्रीला प्रगल्भ केलं. मॅकबेथ, कुनाला कुनाचा मेळ नाही, नागमंडल, सदासर्वदा या सारख्या कलाकृतींमधून ती स्वतःला घडवत गेली.

READ  अभिनेत्री अक्षया देवधरसोबतच्या ब्रेकअपबद्दल अभिनेता सुयश टिळकने केला मोठा खुलासा, म्हणाला, "माझे ब्रेकअप..."

Zee Marathi to launch new show Pahile Na Mi Tula check out exclusive promo

‘कुनाला कुनाचा मेळ नाही’ या प्रयोगासाठी साठी तिचं विशेष कौतुकही झालं. तसेच नागमंडल मधील राणी या व्यक्तिरेखेसाठी तिला रौप्यपदकही मिळालं होतं. रंगमंचावर ताकदीने वावरत असताना तिने शॉर्टफिल्म मधेही अभिनय केलेला आहे. श्राप, चाळा हे तिचे काही चांगले लघुपट. तसेच तिने जाहिरातींतूनही अभिनय केलेला आहे.

नाटक, शॉर्टफिल्म्स आणि आता टेलिव्हिजन मालिका, असा तिचा प्रवास. याशिवाय तिने सई ताम्हणकर आणि लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर यांच्यासह कलरफुल या चित्रपटात सुद्धा भूमिका साकारली आहे. लवकरच तिचा हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Tanvi Mundle

नवोदित तन्वीचा कमी कालावधीत एवढ्या विविध माध्यमांतून झळकणाऱ्या काही मोजक्या गुणी कलाकारांत नक्कीच समावेश केला पाहिजे. तिने आपल्या नाट्य कलाकृतींच्या माध्यमांतून तसेच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलेलं आहे. येणाऱ्या काळात तन्वी ही विविध मालिका आणि सिनेमांतून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन राहील हे मात्र नक्की.

READ  प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत खूपच व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment