अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आपल्या वडिलांच्या आठवणी केल्या शेयर, “हे चमचे म्हणजे फक्त बाबांची आठवण नव्हे तर…..”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“वडील” हे प्रत्येक मूलीच्या आयुष्यातील रियल हिरो असतात. असे म्हणतात ना, आईच्या प्रेमाला तोङ नाही आणि बाबाच्या प्रेमाला सर नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या वडिलांबद्दल एक खास जागा असते. आपल्या वडिलांबद्दल च्या मनातील भावना अभिनेत्री तेजस्वी पंडीत हिने मांडल्या आहेत. तेजस्विनी पंडीत हिच्यासाठी तिचे बाबा म्हणजे सर्वस्व आहे. परंतु ते आता ह्या जगात नाही. मात्र त्यांची आठवण काढल्याशिवाय तिचा दिवस सुद्धा जात नाही. तेजस्विनी ने आपल्या बाबांच्या वाढदिवसाला लिहिलेली पोस्ट हल्ली चांगलीच वायरल होत आहे.

“असे काय आहे, जे तू कधीच कुणाला देणार नाही आणि ते हरवलं तर तुझ्या शरीराचा एखादा भाग नाहीसा झाला असे तुला वाटेल…?” या प्रश्नाचं उत्तर तेजस्विनी पंडीत हिने या पोस्टमध्ये दिलं आहे. ती लिहिते की,”मला अनेक लोकांनी विचारलं की, तुझं Prized Possession काय आहे….? घङ्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स, soft toys की याव्यतिरिक्त आणखी काही….. असं काय आहे, जे तू कधीच कुणाला देणार नाही.”

See also  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे...

तर ह्या त्या दोन गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवर खूप जास्त प्रेम आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे. बाबाने मला एक आदर्श व्यक्ती म्हणून घडवलं. त्यांनी मला संस्कारांसोबत आणखी काय दिलं…तर ते मला एक चांगला कुक होण्याचा वारसा देऊन गेले. हे दोन चमचे आमच्या घरी माझा जन्म झाला तेव्हापासूनच आहेत. आम्ही मोठे होत असताना बाबा catering student आणि आमचं चहा पावडरचं दुकान होतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बाबांनी आम्हां बहिणींना चहा बनवायला शिकवले.

आमच्याकडे चहा खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आणि तो खूप वेगळा लागतो, असं मला वाटतं. त्या चहा पावडर च्या मापाचा हा चमचा आहे आणि दुसरा चमचा म्हणजे साखरेचा आहे. त्याची दांडी तुटली आहे. पण तरीही आजपर्यंत तो चमचा कधीच बदलला गेला नाही. कारण स्वयंपाकातील प्रमाण ह्यांचे आमच्या घरी खूप महत्त्व असते.

See also  कधी काळी पान टपरीवर पान विकायचा हा अभिनेता, आज आहे 'चला हवा येऊ द्या' मधला प्रसिद्ध कलाकार...

हे चमचे म्हणजे फक्त आमच्या बाबांची आठवण नसून आमच्या संस्कारांतील, शिकवणीचं प्रमाण आहे. ज्याच्यावर माझं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आहे. मोजमाप करून चहा करता येईल, परंतु बाबांचे प्रेम मोजता येणारच नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहावेसे वाटले. कारण बाबांचे जास्त फोटो माझ्याकडे नाही. कॅमेर्याचे महत्त्व मला समजण्याआधीच त्यांनी या जगातून निरोप घेतला. आम्ही तुम्हांला खूप मिस करतो….मिस यू बाबा….

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिने व्यक्त केल्या आपल्या भावना; ती म्हणते की,"परजातीत लग्न केले म्हणून लोकांना होतो त्रास...."
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment