फक्त 50 रुपयांत लग्नं केले होते या मराठमोळ्या आदर्श जोडीने, जाणून घ्या महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींची फिल्मी प्रेमकथा…

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी फुल फिल्मी आहे, समस्त महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची अनोखी प्रेमकथा. सुखी, समाधानी आणि आदर्शवत वैवाहिक जीवनाची तब्बल ३० यशस्वी वर्षे पूर्ण करणारा उभयतांचा हा जीवनप्रवास जाणून घेऊ या.

untitled 2 1484726796

आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांची जोडी त्यांच्या रसिक प्रेक्षकांना आणि चाहत्यांना प्रचंड आवडते. मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध जोडप्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आणि अक्षरशः फुल फिल्मी आहे सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी. तर त्याचे झाले असे की…

रथचक्र या मालिकेत सुचित्रा काम काम करत होत्या. या मालिकेच्या एका भागात आदेश यांनी काम केले होते. सुचित्रा केवळ नववीत असल्यापासून आदेश यांना खूप आवडत होत्या. आदेश सुचित्रा यांना पाहताच क्षणी त्यांच्या प्रेमात प’ड’ले होते. त्यामुळे सुचित्रा यांच्या शाळेच्या आसपास, आवारात आदेश अनेक वेळा जात असत. त्यांना पाहून माझा पाठलाग करू नकोस, मी काही तुला होकार देणार नाही असे सुचित्रा यांनी सांगितले होते.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्रीने उचलले पाऊल, तिच्या या कार्याला कराल तुम्हीपण सलाम, जाणून घ्या तिच्या कार्याची गाथा...

3 1487051270 1502951085

पण माघार घेतील ते आदेश कसले? त्यांनी सुचित्रा यांना दादरच्या एक हॉटेलमध्ये भेटायला बोलवले. सुचित्रा आदेश यांना भेटायला जाण्यासाठी एका मैत्रिणीला सोबत घेऊन निघाल्या. पण त्यांना भी’ती वाटत असल्याने त्या हॉटेलमध्ये न जाता दादरमध्ये दुसरी कडेच फिरत राहिल्या. आदेश त्यांची अनेक तास वाट पाहत बसले होते.

पण त्या काही आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी आदेश सुचित्रा यांच्या घरी गेले. पण सुचित्रा घरी पोहोचल्याच नव्हत्या. काहीच वेळात त्या घरी आल्या आणि आदेश यांना आपल्या घरात पाहून त्यांना चांगलाच ध’क्का बसला. आदेश मस्त त्यांच्या आईशी गप्पा मा’र’त होत्या. त्यानंतर सुचित्रा यांच्या आईला बाहेर जायचे होते, म्हणून आदेश आईसोबतच निघाले.

aadesh(2)

पण बस स्टॉपला गेल्यावर मला एक काम आहे असे कारण देत तिथून निघून गेले आणि त्यांनी थेट सुचित्रा यांचे घर गाठले. सुचित्रा यांनी दरवाजा उघडला तर आदेश खूप चि’ड’ले’ले होते. मला हो तर हो नाही तर नाही सांग मी तुला पुन्हा विचारणार नाही. आज मी तुला महालक्ष्मीला घेऊन जाणार होतो. मी तुला पाच मिनिटे देतो मला उत्तर दे असे आदेश म्हणाले. त्यावर थोड्याच वेळात महालक्ष्मीला कधी जायचे असे सुचित्राने आदेशला विचारले. आदेश यांनी अशा वेगळ्यात अंदाजात सुचित्राच्या घरात त्यांना प्रपोज केले होते.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार आहे लग्न बंधनात, नवरदेवाचे नाव आणि काम ऐकून थक्क व्हाल!

सुचित्रा आणि आदेश यांच्या नात्याला सुचित्रा यांच्या घरातून खूप वि’रो’ध होता. आदेश त्यावेळी इंडस्ट्रीत स्ट्र’ग’ल करत होते. पण घरातल्यांच्या वि’रो’धा’ला न जुमानता सुचित्राने त्यांच्या सोबत लग्न केले. मी क्लासला जाते असे सांगून त्या घरातून निघून गेल्या आणि त्यांनी बांद्रा को’र्टा’त जाऊन आदेश यांच्या सोबत लग्न केले. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांच्या लग्नाचा खर्च केवळ ५० रुपये आला होता.

24screening of thackrey3

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आदेश सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबियांचे, त्यांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांनी नुकताच त्यांचा आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

See also  रितेश देशमुखची 'या' अभिनेत्री सोबत होत असलेली जवळीक पाहून भ'ड'क'ली जेनेलिया, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल...

आदेश आणि सुचित्रा यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. आदेश आणि सुचित्रा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या लग्नाला 30 हून अधिक वर्षं झाले असून त्यांना मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचे नाव सोहम आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close