खजूर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?
.
फळ, भाज्या ह्यासोबतच सुकामेवा देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सुकामेव्यातील खजूर त्याच्या चवीसह आरोग्यदायी गुणधर्मामुळे प्रसिध्द आहे. विविध जीवनसत्त्वे, खनिजे ह्यासोबतच ऊर्जेचा परिपूर्ण स्रोत आहे. जाणून घ्या खजुराच्या सेवनाचे हे फायदे.
दररोज खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल कमी करणे, इथेरोस्क्लेरोसिस पासून बचाव करणे ह्यासाठी खजुराचे सेवन करावे.
ह्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. काही संशोधनातून असे सिद्ध झाले आजे की खजुराचे नियमित सेवन बद्धकोष्ठता, कोलोन कॅन्सर ह्यांसारख्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करते.
ह्यात असणारे लोह रक्ताची कमी आणि ऍनिमिया सारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन सी आणि डी ने भरपूर असणारे खजूर अँटी-एजिंगचे काम करते. चमकदार त्वचा, सुरकुत्या कमी करणे ह्यासोबतच अकाली पांढरे होणारे केस ह्यावर देखील खजूर अतिशय गुणकारी आहे.
खजुरामध्ये अँटी-बॅक्टरीअल गुणधर्म असतात. ह्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
खजूर हाडांसाठी ही खूप फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि हाडांची झीज थांबवण्यासाठी खजुर खाणे फायद्याचे ठरते.
गर्भवती स्त्रियांनी खजुराचे सेवन अवश्य करावे. निरोगी गर्भधारणेसह, बाळाचे स्नायू मजबूत होण्यासाठी खजूर उपयुक्त आहे. शिवाय ह्याच्या सेवनाने आईला प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी करण्यास मदत होते, आईला चांगले दूध सुटते.
मेंदूची गती आणि क्षमता वाढवण्यासाठी खजूर गुणकारी आहे. स्मरणशक्ती वाढवण्यास ह्यामुळे मदत होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.