तब्बल 22 वर्षांनंतर भाग्यश्री आणि सलमान आले पुन्हा एकत्र, तेव्हा जे घडलं ते ऐकून ते पाहून चाहते झाले मदहोश
बिग बॉस हा कॉन्ट्रोवर्शियल शो तुमचा- आमचा सर्वांचा फेवरेट शो आहे. सध्या Bigg boss Season 15 सुरू आहे. या शो मधील विकेंड का वार मध्ये अभिनेता सलमान खान सोबत त्याच्या सर्वांत पहिल्या सुपरङुपरहिट फिल्म मधील को स्टार अभिनेत्री भाग्यश्री दिसली. या शो मध्ये सलमान आणि भाग्यश्री हे कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या दोघांनीही आपल्या चित्रपटातील गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करून बिग बॉस 15 चा मंच दणाणून टाकला.
बजरंगी भाईजान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांनी एकमेकांसोबत काम केलेला पहिलावहिला चित्रपट “मैंने प्यार किया” हा 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक असा हिट चित्रपट ठरला, ज्याची जादू चाहत्यांच्या मनावर आजवर कायम आहे. लगबग 22 वर्षांनंतर सलमान खान आणि भाग्यश्री हे टेलिव्हिजन वरील स्क्रीन वर इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसल्याने हे रमणीय दृश्य चाहत्यांसाठी काही खास होते.
या शो मध्ये अभिनेत्री भाग्यश्री ही गुलाबी रंगाच्या साङी मध्ये पोहचली होती. तसेच सलमानने सायकलवरून एंट्री मारली होती. आपल्या सल्लू भाईजानने सायकलवरून एंट्री होताच “मैंने प्यार किया” या चित्रपटातील “तुम लडकी हो” हे गाणे सुरू झाले व त्यानंतर त्या दोघांनीही खूप सुंदर परफॉर्मन्स सादर केला. तुम्हांला ठाऊक आहे का, बिग बॉस च्या या सेटवर भाग्यश्रीची दोन मुलं अभिमन्यू आणि सान्या मल्होत्रा हे देखील पोहोचले होते.
“मैंने प्यार किया” या चित्रपटात सलमान खान, भाग्यश्री सोबत आलोकनाथ, मोहनीश बहल, रीमा लागू यांसारखे अनेक कलाकार होते. या शो मध्ये भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू याचा चित्रपट मीनाक्षी सुंदरेश्वर याविषयी देखील चर्चा झाली. ज्यामध्ये त्याची को स्टार सान्या मल्होत्रा आहे.
सान्या मल्होत्रा ने जेव्हा सलमान व भाग्यश्री यांच्या चित्रपटादरम्यानचे काही किस्से शेयर करायला सांगितले. तेव्हा सलमानने मस्करीत विचारले की, भाग्यश्री आता सुद्धा कधी बेशुद्ध होते का? त्यावर भाग्यश्री ने हसत उत्तर दिले की,”मी फक्त एकदाच शूटिंग दरम्यान बेशुद्ध झाली होती. तेव्हा मला 105 ङिग्री ताप होता. तरीही मी शूटिंग रद्द केले नव्हते. त्यादरम्यान मी बेशुद्ध झाली होती आणि सलमानने मला सावरले होते.
बिग बॉस 15 च्या मंचावर सलमान खानने आणखी एक किस्सा शेयर केला. जेव्हा त्याने शूटिंग दरम्यान सेटवर भाग्यश्रीला भूत बनवून घाबरवले होते. त्याने सांगितले की,”एकदा शूटिंग दरम्यान सेटवर भूत बनून त्याने भाग्यश्रीचा दरवाजा ठोठावला होता. तेव्हा भाग्यश्री खूप घाबरली होती.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.