कतरिना- विक्की नंतर हे ब्युटीफूल कपल सुद्धा अडकणार लवकरच विवाहबंधनात, अखेर ठरला मार्चचा मुहूर्त…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“शुभमंगल सावधान” चा जणूकाही ट्रेन्डच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण चंदेरी दुनियेतील बोल्ड व ग्लॅमरस कपल्स हे एकापाठोपाठ एक बोहल्यावर चढताना दिसत आहेत. बॉलीवुडची क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे कपल नुकतंच विवाहबंधनात अङकलं. तर आता आणखी कपल लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. कोरोनामुळे हे लग्न सारखे सारखे पुढे ढकलावे लागत होते. परंतु आता त्यांच्या लग्नाची सगळी तयारी झाली आहे.

रिचा चङङा आणि अली फजल हे कपल मागील कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तर आता फायनली हे कपल लग्नासाठी सज्ज झाले आहे. मीडियाच्या माहितीनुसार हे लवबर्ङ येत्या नवीन वर्षातील मार्च महिन्यात एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. हे कपल एक इंटिमेंट लग्न करणार असून सध्या ते लग्नासाठी परफेक्ट लोकेशन पाहत आहे.

See also  सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये, आता आहेत खूपच प्रसिद्ध अभिनेते...

हे लग्न मुंबईत किंवा दिल्लीत होण्याचा अंदाज आहे, अशी चर्चा सध्या होत आहे. त्याचप्रमाणे पुढच्या नव्या वर्षात रिचा व अली हे दोघेही आपापल्या प्रोजेक्टस मध्ये व्यस्त असणार आहेत. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लग्न उरकायचे ठरवले आहे. यासाठी त्या दोघांनीही मार्च महिना निवडला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी लग्नाच्या प्लॅनिंग विषयी चर्चा सुद्धा केली आहे. खरंतर तेव्हा रिचा ने लग्नाचे प्लॅनिंग सांगण्याऐवजी ते आपल्या शेड्युल मध्ये किती व्यस्त आहेत, हेच त्यांनी सांगितले. तेव्हा रिचा म्हणाली होती की,”आमच्या लग्नाचे प्लॅनिंग करायचे झाले, तर आम्हांला संपूर्ण प्रोडक्शन टीम लागेल. कारण सध्या तर आम्ही खूप बिझी आहोत. अलीला तर कसेबसे महिन्यातून अवघे पाच दिवस फ्री मिळतात.

See also  मोठा निर्णय: आता ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल

आम्ही दोघे कमिटमेंटला घाबरतो, असे मुळीच नाही. परंतु सध्या आम्ही खरंच बिझी आहोत. आम्ही एवढे बिझी आहोत की, आम्हांला एकमेकांना भेटायला सुद्धा वेळ नाही. बहुतेकदा तर आम्ही महिन्यातून फक्त दोनदा भेटतो. कित्येक वेळा तर अंधेरी ते वांद्रे हे अंतर देखील अतिशय लाँग ङिस्टन्स वाटते. अली पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडीओ कॉल वरूनच बोलतो. अशा परिस्थितीत आम्ही लग्न तरी कसे करू शकतो, असे रिचा म्हणाली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता अक्षय कुमारची सहज पडली एका गरीब मुलावर नजर, त्यानंतर अक्षयने जे केले ते पाहून तुम्हालाही गर्व वाटेल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment