धर्मेंद्र सोबत लग्नानंतर हेमा मालिनीला झाला होता पश्चाताप, स्वतः हेमा मालिनीने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘प’श्चा’ता’प’ हा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा केव्हातरी का होईना होतोच. मग ती सर्वसाधारण व्यक्ती असो किंवा मग एखादी दिग्गज व्यक्ती असो. बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील एक नामांकित अभिनेत्री हेमामालिनी यांना देखील आपल्या चुकीचा पश्चाताप उशीरा का होईना. परंतु झाला बरं…. तुम्ही विचार करत असाल की, हेमामालिनी ही एवढी मोठी अभिनेत्री असूनही तिने कोणती बरं चूक केली असेल.

तर मित्रांनो त्याचे झाले असे की, अभिनेते धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमामालिनी सोबत लग्न केले. तेव्हा ते आधीपासून विवाहित तर होतेच. पण त्याचबरोबर ते चार मुलांचे वडील सुद्धा होते. त्यामुळे फक्त हेमामालिनी यांच्या पॅरेन्ट्सची नव्हे तर धर्मेंद्र यांच्या पॅरेन्ट्सची सुद्धा त्यांच्या लग्नासाठी सहमती नव्हती. मात्र तरीदेखील त्या दोघांनी 1980 मध्ये एकमेकांसोबत लग्न केले.

See also  'दीया और बाती हम' फेम संध्याने या उद्योगपतीशी लग्न का केलं माहितेय? लग्न करण्यामागे आहे खास कारण...

लग्नानंतर कित्येक वर्षांनंतर हेमामालिनीने आपल्या विवाहाविषयी अखेर सांगितले. ती म्हणते की,”मी असे म्हणत नाही की, सर्वकाही अगदी ठीक आहे. कारण आयुष्यात व्यक्तीला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळत नाही. त्यामुळे माझ्या अपेक्षेप्रमाणे मला देखील जास्त काही मिळाले नाही.

हेमामालिनीने म्हटले की, आपल्याला आयुष्यात जे भेटले नाही. ते मी आठवणीत आणत नाही. लग्नानंतर तिच्या आयुष्याची तीस वर्षे मुलांचा सांभाळ आणि घरची- बाहेरची कामे करण्यातच गेली. धर्मेंद्र सोबत लग्न केल्यावर मी माझ्यातील काही उणीवा पाहिल्या. तिला या गोष्टीचा सर्वांत जास्त पश्चाताप व्हायचा की लग्नानंतर तिला धर्मेंद्र सोबत जास्त वेळ घालवायला मिळत नव्हते.

कारण तिला असे वाटायचे की, तिला आपल्या पतीचे भरपूर प्रेम आणि साथ मिळेल. परंतु तसे काहीच होऊ शकले नाही. त्यामुळे तिला आता या सर्व गोष्टींची कमी भासू लागली आहे. मात्र तिने हे देखील सांगितले होते की, तिने आता परिस्थितीचा स्वीकार केला आहे. आपल्या मुलींना लहानाचे मोठे करताना तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. फक्त एका व्यक्तीसाठी मला ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागल्या. जेव्हा मला धर्मेंद्रचे प्रेम आठवते, तेव्हा मला ह्या सर्व गोष्टींचा विसर पडतो.

See also  जेव्हा सैफ अली खानला रंगेहाथ पकडले होते करीनाने, तेव्हा अशी होती तिची रिएक्शन...

अभिनेत्री हेमामालिनी हिने सांगितले की, धर्मेंद्र तिच्यावर अगदी वेड्यासारखे प्रेम करत होते. त्यामुळे जेव्हा तिला त्यांच्या भावना आठवतात, तेव्हा धर्मेंद्र जरी सोबत नसले, तरीही तिच्या मनाला थोडाफार आधार मिळतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment