“अरे देवा, ही तर नाइटी घालून आली..” करीना कपूरला पाहून चाहत्यांनी केले तिला ट्रोल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची मल्लिका अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच आपल्या ग्लॅमरस लुकमुळे लाइमलाइट मध्ये असते. आपल्या फॅन्सना स्वतःकडे आकर्षित करताना कित्येकदा करीना ट्रोल सुद्धा होते. असेच काहीसे यावेळी सुद्धा घडले आहे. करीना ला तिच्या आऊटफिट मुळे युजर्सने बरेच ट्रोल केले आहे.

करीना कपूर खान ही नुकतीच मुंबई मध्ये स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचा जाळीदार टॉप परिधान केला होता. या टॉपचा लुक अगदी नाईटीसारखाच होता. म्हणून तिला खूप ट्रोल करण्यात आले. करीनाने नेट नेकलाईन असलेल्या टॉप मध्ये अगदी वेगवेगळ्या स्टाईलिश पोझ दिल्या. म्हणून तिला भरपूर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

See also  अभिनेत्री कतरिना कैफने केले सलमान खानवर आरोप, म्हणाली सलमानने सेटवर...

बेबो चा हा लुक पाहिल्यावर सोशल मीडियावर एका युजरने कमेंट करत चक्क असे म्हटले आहे की, हे स्टार लोक कितीही श्रीमंत असले, तरीही यांच्याकडे चांगले कपडे कधीच नसतात. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की,”नाइटी घालून आली गं बया…आता तर यांचे स्टाईलिश कपडे सुद्धा संपले. हे देवा, परमेश्वरा…अजून काय दाखवणार आहेस रे बाबा.”

त्याचप्रमाणे आणखी एका युजरने म्हटले आहे की, “बेबो तर आता नाइटी सुद्धा टॉप सारखीच परिधान करून यायला लागली. तू एवढी गरीब झालीस का आता की तुझ्याकडे नीटनेटके कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाहीत. म्हणून बिचारी एकच आऊटफिट वेगवेगळ्या पद्धतीने परिधान करायला लागली.”

बॉलीवुडची क्वीन करीना कपूर खान हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, ती लवकरच “लाल सिंह चङङा” या चित्रपटात झळकणार आहेत. तर यामध्ये तिच्यासोबत बॉलीवुडचा परफेक्शनिस्ट आमीर खान दिसणार आहे.

See also  या मोठ्या कारणांमुळे लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ झाली बंद, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment