सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शेयर केली ही भावुक पोस्ट
अनाथ मुलांसाठी झटणाऱ्या महान समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या आजाराने त्यांचे निधन झाले. माईंच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच खूप दुःख झाले. त्यांच्या निधनानंतर बहुतेकांनी शोक व्यक्त केला.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेत्री तेजस्वी पंडीत हिने प्रमुख भूमिका साकारली होती. सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडीत हिने एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. माईंच्या निधनानंतर अनेकांनी तेजस्विनी च्या प्रतिक्रियेची वाट पाहिली. परंतु सोशल मीडियावर कुठेच तिने कोणतीही भावना व्यक्त केली नाही. मात्र आता धक्क्यातून सावरत तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.
बहुतेक जणांनी तेजस्विनी पंडीतला तू अजूनपर्यंत काहीच कसे लिहिले नाही, पोस्ट पण केले नाही, असे विचारले आहे. परंतु कुटुंबाततील एखादी व्यक्ती गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या मनःस्थितीत सुद्धा आपण नसतो. माझी सुद्धा अशीच काहीशी अवस्था झाली. रात्री ममता ताईंच्या कॉलनंतर बातमी कन्फर्म झाल्यावर अक्षरशः पायाखालील जमीन सरकली. कारण ती वेळ खरंच खूप नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही… परंतु तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊन जाते, जिच्या येण्याने तुमचं आयुष्यच बदलून जाते. यामध्ये त्यांचा हातभार आहे, याचं त्यांना भान सुद्धा नसते. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग सुद्धा आला. कधीही कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” असे म्हणणार्या माईंना माझं नाव अगदी तोंडपाठ होतं. माझा चित्रपट पाहून त्या म्हणायच्या की,”मी आयुष्यभर काम केलं. परंतु तू उत्कृष्ट अभिनय साकारत मला जीवंत केलं. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. खरंच खूप अभिमान वाटतो की मी ज्या कलाक्षेत्रात काम करते, त्यातूनच माईंचे हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा का होईना मला उचलता आला. कळत नकळत तुम्ही भरभरून दिलं माई ! असे तेजस्विनी पंडीत हिने म्हटले आहे.
प्रत्येकाला “बाळ” म्हणून हाक देणाऱ्या सिंधुताई ह्या कित्येकांची माय होत्या. जन्म न देता त्यांनी कित्येक अनाथ मुलांना आईसारखी माया दिली. म्हणून तर त्या सगळ्यांच्या माई होत्या. शेवटच्या क्षणी माईंना कुणाची काळजी होती, तर ती म्हणजे आपल्या पिल्लांची. “माझी मुलं कशी आहेत, माझ्या मुलांची काळजी घ्या,” हे माईंचे अखेरचे शब्द होते. अखेरच्या क्षणी देखील माईंना आपल्या लेकरांचीच काळजी होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.