चेहऱ्याची सर्जरी करून या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ने स्वतःच्या हाताने लावली चेहऱ्याची वाट…,
बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रियेचा सहारा घेतला आणि याच कारणामुळे त्या फिल्म इंडस्ट्रीत कायम टिकून राहिल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचे तर अभिनेत्री मौनी रॉय हे यासाठीचे एक उत्तम उदाहरण आहे.
मौनी रॉयने तिच्या चेहऱ्यावर आणि नाकावर प्लास्टिक सर्जरी केली आहे, ज्यामुळे ती आता खूपच सुंदर दिसत आहे. पण कधी कधी ही शस्त्रक्रिया इतकी महाग पडते जितकी तुम्ही कल्पनाही केली नसेल. खरंतर, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणार्या आयशा टाकियाचा एक ताजा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या चेहऱ्यावरून ओळखली जात नाहीये.
आयशा टाकिया हिने सलमान खानसोबत वॉन्टेड या चित्रपटात काम केले होते आणि तिची सुंदरताही खूप चांगली होती पण तिने आपली शस्त्रक्रिया केली आहे आणि आता त्यामुळे तिचा चेहरा ओळखणे कठीण झाले आहे.
आयशा टाकियाने केली महागडी चेहऱ्याची सर्जरी-
बॉलीवूड अभिनेत्री आयशा टाकिया बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या पडद्यावर दिसलेली नाही. तिची ‘वॉन्टेड’ चित्रपटातील भूमिका लोकांना आजही आठवते आणि आता मात्र ही अभिनेत्री कुठे हरवली याचा शोध प्रेक्षक घेत असल्याचे दिसत आहे. परंतु, आयशा टाकियाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि हळूहळू तिने स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दुरावले होते.
अलीकडे आयशा टाकियाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिला ओळखणेही कठीण झाले आहे. आयशा टाकियाच्या नाकावर आणि चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यानंतर तिचे संपूर्ण रूपच बदलले असून तिला ओळखता येणेही कठीण झाले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्मी करिअर करण्यासाठी चेहऱ्याची शस्त्रक्रिया करून घेतली. काहीवेळा त्यांची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरते, तर काही वेळा त्यांना याबाबतच्या काही उलट परिणामांना सामोरे जावे लागते. बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियासोबतही असंच काहीसं घडलं आहे.
डोळ्यांवर आणि नाकावर शस्त्रक्रिया केलेल्या आयशा टाकियाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. शस्त्रक्रियेनंतर आयशा टाकियाला ओळखने अतिशय कठीण झाले आहे आणि याच कारणामुळे चाहते तिची खिल्ली उडवत आहेत, लोक म्हणतात की, आयशा टाकिया सर्जरीपूर्वी सुंदर दिसायची पण आता ती खूप विचित्र दिसू लागली आहे.