सोहम ने घातलेल्या विचित्र अटीमुळे अभिजितराजें सोडणार का घर? शुभ्रा आणि आसावरी ही सोडणार का सोहमला? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे जाणुन घ्या “अग्ग बाई सासूबाई” च्या आजच्या भागात..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

सध्या लॉकडाऊन असल्याने कुटुंबांचे सगळे सदस्य घरी बसून मनोरंजन कार्यक्रम बघण्यात व्यस्त असताना दिसून येत आहे. त्यात महाराष्ट्रात मराठी सिरीयल घराघरात चाललेली असते. सध्याही झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी लागणारी ‘ अग्गबाई सासूबाई ’ ही सिरीयल खूप चाललेली आहे.

त्या सिरीयलचा विषय लॉक डाऊन नंतर जास्त चर्चेत यायला लागला आहे. तो म्हणजे सोहम आणि अभिजितराजे यांचं वादविवाद प्रकरण काही थांबायचं नाव घेत नाही आहे. कालच्या एपिसोड पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की सोहम अभिजित राजेना माझी गाडी आली की तुम्ही घर सोडा असं सांगतो. पण आसावरी आणि शुभ्रा ला सोह्मचा हा निर्णय पटत नाही. पण आता १ ऑगस्टच्या एपिसोड मध्ये नेमकं काय झालं ? ते पाहूयात.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालची पत्नी आहे दया भाभींपेक्षाही आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, फोटो पाहून थक्क व्हाल

१ ऑगस्टच्या भागाला सुरुवात होते सोह्मच्या दारावर नेमप्लेट लावण्यावरून. तेव्हा सोहम घरात येतो. आसावरीने लाडू केलेले असतात. तेव्हा सोहम आईला विचारतो की तू हे लाडू का केले आहेत ? तेव्हा आसावरी सौम्य शब्दात उत्तर देते की काहीही झालं तरी अभिजित राजे कुठेही जाणार नाही आहेत. म्हणून त्यांच्यासाठी मी नेहमीप्रमाणे हे लाडू केलेले आहेत. तेव्हा सोहम संतापतो.

शुभ्रा आणि आसावरी त्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात की सोहम वेड्यावाणी करू नकोस. याआधी तूच म्हणला होता फोनवर की अभिजित राजे कुठेही जाणार नाहीत म्हणून. मग आता का असे करतोस तू ? हे बघा मी कधीही म्हणलेलो नाही. काहीही झालं तरी माझी गाडी आल्यावर ठरल्याप्रमाणे अभिजित राजेंना घर सोडून जावा लागेल. मीच त्यांना नव्या गाडीत सोडून येणार आहे.

See also  'तू सौभाग्यवती हो' मधील ऐश्वर्या आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सोह्मने नवा बिझनेस चालू केलेला असतो. तोही खोट्या डिग्री मार्क सारखा नसावा म्हणून आसावरी, शुभ्रा सगळेच काळजीत असतात. बिझनेस जोरात असल्याने त्याच्याकडे खूप पैसे येतात. त्यामुळे तो मोठी गाडी घ्यायची ठरवितो.

download

तेव्हा आई ऐक तुला साडी, चोळी तुला वाट्टेल ते सांग मी घेईन पण अभिजित राजेंना मात्र काहीही न घेता माझी गाडी आल्यावर घर सोडून जावा लागेल. आसावरी आणि शुभ्रा खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न करतात. पण सोहम त्याच्या निर्णयावर ठाम असतो. सोहम रागाच्या भरत अभिजित राजेंच्या नावाची नेमप्लेट शुभ्रा समोर फाडून टाकतो.

हे घर कुलकर्णीचं आहे आणि राहणार असं म्हणून दोघांत वाद पेटतो. त्याचं वेळी अभिजित राजे म्हणतात की सोहम बरोबर बोलतोय मला आता इथून जावं लागेल. मीच चुकीचं अर्थ काढत बसलो. पुढे आसावरी किचन मध्ये अभिजित राजे च्या आठवणीत असते. तेवढ्यात तिची नजर एका कवितेच्या वर जाते.

See also  आईविषयी असे काही ऐकून खूपच सं'तापली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, म्हणाली, "माझ्या आईने..."

जी अभिजित राजेंनी तिच्यासाठी लिहिलेली असते. ती घरात जाऊन घरभर अभिजित राजेंना शोधते. अभिजित राजे तिच्या जवळच असतात. “ मी शरीराने जरी आता इथून पुढे तुझ्या सोबत नसलो तरी मनाने तुझ्या सोबत नेहमी आहे आणि असणार आहेच. तेव्हा तुम्ही कुठेही जाणार नाही आणि गेलात तर मी तुमच्या बरोबर येईल असं बोलते. शुभ्रा ही म्हणते की मी ही येईल.

तेवढ्यात बाहेर सोहमची नवी गाडी येते आणि अभिजित राजे भरलेली ब्याग उचलतात पण शुभ्रा त्यांना अडवते. बोलते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आता उदयाच्या एपिसोड मध्ये नेमकं काय होतं पाहूयात उदयाच्या भागात..

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment