आसावरी जाणार का खरंच जाणार का अभिजीतराजें सोबत, जाणुन घ्या नेमकं काय झालं आजच्या भागात?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

झी मराठी वाहिनीवर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या “ अग्ग बाई सासूबाई ” या मालिकेच्या कालच्या म्हणजेच १ ऑगस्टच्या भागात आपण शेवटी पाहिलं की सोह्मने ने त्याची नवी गाडी विकत घेतली होती. त्यामुळे अभिजित राजेना ठरल्याप्रमाणे घर सोडून जावा लागणार होतं. यामुळे आसावरी आणि शुभ्रा खूप टेन्शन मध्ये दिसत होत्या. चला मग जाणुन घेऊयात की पुढे नेमकं काय झालं ?

“आई, माझी गाडी आली. आता ठरल्याप्रमाणे अभिजित राजेंना घर सोडून जावा लागेल. चला तुमची ब्याग भरा अभिजित राजे, मी तुम्हाला माझ्या नव्या गाडीत सोडून येतो. असं म्हणल्यानंतर अभिजित राजे वर ब्याग आणायला जातात. तेव्हा आसावरी सोहम ला सांगते की बाबा तूच म्हणला होता की रहा इथे म्हणून.

See also  'तारक मेहता...' मधील हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

तेव्हा सोहम काही ऐकत नाही. तिकडे ब्याग घेऊन निघणाऱ्या अभिजित राजेंना शुभ्रा अडवते. तुम्ही घर सोडून जाणार नाही सर ! अहो तुमच्या मुलीला तुमची खूप गरज आहे. असं शुभ्रा म्हणल्यावर अभिजित राजे म्हणतात की शुभ्रा मलाही नाही वाटत तुम्हाला सोडून जाऊ.

पण सोह्मने पैंज जिंकली आहे. त्यामुळे आता मला जावा लागेल. अभिजित राजे जायला तयार असतात. शुभ्राला पुढे काही बोलता येत नाही. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिकडे आसावरी सोह्मला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करते. पण सोहम काहीही ऐकायला तयार नसतो.

शेवटी पाणावलेल्या डोळ्यानी शुभ्रा अभिजित राजे यांना म्हणते की सर तुम्ही जा. खरच जा.कारण मला तुमचा स्वाभिमान अभिमानानं टिकला तर आनंद आहे. तो जर दुखवला गेला तर काय उपयोग ? अभिजित राजे रडणाऱ्या शुभ्राचं सांत्वन करतात.

See also  अनिरुद्ध आणि संजना लग्न करतायत! पण मग अरुंधतीचं काय? आई कुठे काय करते या मालिकेत नेमकं काय घडलं आजच्या भागात

त्यानंतर आसावरी सुद्धा अभिजित राजेंना अडवते. नका जाऊ अशी विनवणी करते. पण अभिजित राजेंच आता पक्कं ठरलेलं असतं. ते ब्याग घेऊन बाहेर गाडीपाशी येतात. गाडी पाहुन आनंदी चेहऱ्याने सोह्मला म्हणतात की “ छान गाडी ये बरका तुझी. मस्त. त्यावर सोहम म्हणतो की आवडली ना.

मग तयार आहात ना नव्या गाडीत पहिली सवारी करायला ? हो मग काय अरे आनंदात ! अभिजित राजेंच्या आतून मनात जाणं सलत असतं पण बाहेरून ते कुणालाही कळून देत नाहीत. बरं सोहम ब्याग उचलून ठेव गाडीत. कारण तसेही बापाचं ओझं मुलालाच उचलायचं असतं. सोहम ब्याग घेऊन गाडीत ठेवतो.

शुभ्रा आणि आसावरी दोघेही रडका चेहऱ्याने उभा. अभिजित राजे गाडीत बसणार तेवढ्यात आसावरीचा बांध फुटतो. “ जर तुम्ही घर सोडून जाणार असाल तर मीही तुमच्या सोबत येणार आहे. असं आसावरी ने म्हणल्यावर सोह्मची खरी अडचणी निर्माण होते. सोह्मला काय करावं हे कळत नाही. अभिजित राजे ही गाडीतून बाहेर येतात. शुभ्रा ही आसावरी म्हणजे सासूकडे बघत राहते. कारण तिच्या या निर्णयाने सोह्मचे चांगलेच वांधे होतात.

See also  'तुला पाहते रे' मधील या अभिनेत्रीने केले आहे कौतुकास्पद काम, ऐकून तुम्हालाही गर्व वाटेल...

मालिकेतील हा नवा ट्वीस्ट पाहून प्रेक्षक ही आश्चर्यचकित होतात. अनपेक्षित ठिकाणी आणून मालिकेचा भाग संपतो. आता अभिजित राजे घर सोडून जाणार का ? की आसावरी आणि शुभ्रा दोघेही घर सोडून जावून अभिजित राजे सोबत जाऊन सोह्मला एकटं पाडतायत की काय ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आता उदयाच्या भागात पाहायला मिळणार आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment