बापाला घराबाहेर काढणाऱ्या मुलावरचं आली पळून जायची वेळ! बाप बनून अभिजित राजे जातील का मुलगा सोह्मच्या मदतीला?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

झी मराठीवर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असलेल्या ‘ अग बाई सासूबाई ’ या मालिकेला नवं वळण लागलेलं आहे. प्रत्येक भागात पडणारा ट्वीस्ट लोकांना पुढील भाग पाहण्यास भाग पाडतो आहे. सध्या ही मालिका टीआरपी च्या बाबत आघाडीवर दिसत आहे.

मालिकेत सोहम नवा बिझनेस सुरु करतो. कमी दिवसांत जास्त पैसे कमवणे हा त्याचा हेतु असतो. तेव्हा अभिजित राजेंना घरातून बाहेर काढण्यासाठी सोहम एक शक्कल लढवतो. तो अभिजित राजेंना सांगतो की जर माझी नवीन गाडी आली तर तुम्हाला घर सोडून जावा लागेल.

सोहमला मित्रासोबत सुरु केलेला बिझनेस वर प्रचंड भरवसा असतो. तो हप्त्यावर एक कार विकत घेतो. ठरल्याप्रमाणे अभिजित राजे ब्याग घेऊन गाडीत बसायला लागतात. तेव्हा आसावरी म्हणते की मलाही तुमच्या बरोबर यायचं आहे. तेव्हा अभिजित राजे म्हणतात की गाडीत जागा कुठय. तू बसणार कुठे. यावर सोहम गोंधळात पडतो.

तेवढयात कंपनी मधून गाडी घेऊन आलेल्या माणसाला सोहम गाडीची चावी मागतो. पण होतं असं की तो माणूस चावी द्यायला तयार होत नाही. उलट तो म्हणतो की मला पाच लाख डाऊनपेमेंट दया कारण कंपनीने तुमच्याकडून घ्यायला सांगितलं आहे. सोहमला राग येतो. तो लगेच त्याच्या मित्राला फोन लावतो.

See also  'लागीर झालं जी' मधील टॅलेंटला लोक या कारणामुळे हिणवायचे, पण आज आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता...

मला हा माणूस गाडीची चावी देत नाही. काय अडचण आहे ? त्यांना पाठ्य्व बरं पाच लाख रुपये. तेव्हा त्याचा मित्र सोहमला समजावून सांगतो की मित्रा आपला बिझनेस अचानक डबघाईला आलेला आहे. खूप मोठा तोटा आपल्याला झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला काहीच शक्य होणार नाही. तु एक काम कर त्यांना त्यांची गाडी परत देऊन टाक.

जेव्हा सोहम त्या माणसाला घडलेला प्रकार सांगतो. आणि म्हणतो की गाडी राहूद्या पण पैसे नंतर भरतो. मी नक्की काहीतरी करतो. तेव्हा तो व्यक्ती रागाने सोह्मच्या हातातून गाडीची चावी हिसकावुन घेतो. आणि म्हणतो की चार आन्या ची लायकी नाय आणि चालेलत कार घ्यायला. यावर सोहमला काय करावं कळत नाही. तो माणूस सगळ्यांना गाडीतून खाली उतरून देतो.

See also  संजना आणि अनिरुद्धचे लग्न व्हावे असे का वाटत आहे अरुंधतीला? जाणून घ्या काय घडले आजच्या भागात...

पण त्यांची शेजारीण प्रज्ञा म्हणते की मी गाडीवरून उतरणार नाही ही गाडी आमची आहे. पण तो गाडी मालक सगळ्यांना उतरवतो. अभिजित राजे ब्याग काढून घेतात. तो माणूस कार घेऊन निघून जातो. इकडं सोसायटीच्या बायका गोंधळ घालू लागतात. तेव्हा शुभ्रा रागाने सोहमला म्हणते की असा नेमकं कोणता बिझनेस होता, ज्यावर तू गाडी घ्यायला निघालास ? गप्प का सोहम सांग ? सोहम घाबरतो.

आणि म्हणतो की मला एक फोन करायचा आहे. मी आलोच. असं म्हणून सोहम तिथून घाबरून निघून जातो. सोसायटीच्या बायका सगळ्या आसावरीला पैसे मागतात. कारण त्यांनी सोह्मच्या म्हणण्यानुसार बिझनेस मध्ये पैसे गुंतवलेले असतात. आसावरी घाबरते.

शुभ्रा सोहमला फोन लावते. पण घाबरून काय करावं आणि काय नाही या विचारात सोहम सिमकार्ड काढून टाकतो. तेवढयात अभिजित राजे सोहमला शोधत तिथे येतात. तेव्हा अभिजित राजेंना पाहून सोहम चक्क त्यांचे पाय धरतो. अभिजित राजे सोहमला उठवतात. तेव्हा सोहम बोलतो की मी काहीच केलेलं नाही आहे.

See also  सोहम खेळतोय आसावरी, शुभ्रा आणि अभिजितराजेंच्या विरोधात ही नवीन चाल !

मला कृपया करून वाचवा. खूप चुकलं माझं सॉरी. इकडं शुभ्रा आणि आसावरी चिंतेत घरात बसलेल्या असतात. तेवढ्यात घराची बेल वाजते. सगळ्या सोसायटीच्या महिला घरात घुसून पैसे मागतात. नाही दिले तर आम्ही काहीही घेऊन जाऊ घरातलं. सगळ्या महिला वाटेल भांडे कुंडे उचलतात. बाहेर निघतात. तेवढ्यात अभिजित राजे आणि सोहम येतात. सगळ्या बाया सोहमला पैसे मागतात. तेव्हा अभिजित राजेंना तुम्ही थोडे थोडे सगळ्यांना पैसे देण्याची विनंती करतो.

किती जणांना तू पैसे दिले. थांबा लिस्ट आहे. कागदाची लिस्ट अभिजित राजे सोह्मकडून घेतात. तो कागद खूप नावानी भरलेला असतो. काही बिल्डींग मधील आहेत आणि काही बाहेरील. असं सोहम जेव्हा म्हणतो तेव्हा आसावरी आणि शुभ्रा विचारत पडतात की असा नेमकं कोणता बिझनेस होता. इथेच एपिसोड संपतो.

तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो की बापाला बाहेर काढणाऱ्या पोराच्या मदतीला अभिजित राजे बाप बनुन धावून जातील का ? पुढे नेमकं काय होणार ? याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. पुढील भागात पाहूया पुढील माहिती.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment