बबड्याची लाज राखूनही का अभिजित राजेंना घरात परकं वाटतय? सोहम का शुभ्रा आणि अभिजित राजे बद्दल वाईट विचार करतोय?

Advertisement

.

झी मराठी वाहिनीवर सध्या “ अग्ग बाई सासूबाई ” ही मालिका चांगलीच रंगलेली आहे. तिच्यामध्ये येणारा ट्वीस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. त्यामुळे मालिका सध्या जोरात चाललेली आहे.

Advertisement

कालच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं होतं की सोहमच्या खोट्या बिझनेसचा सगळ्यांना थांग पत्ता लागलेला होता. त्यात सोहमने सोसायटीच्या काही गृहिणी यांच्याकडून पैसे बिझनेस उभा करायला घेतले होते. तेही बिझनेस डुबल्यामुळे पाण्यात गेले. त्यामुळे सोहम खूप घाबरतो आणि शेवटी तो ज्या अभिजित राजेंना घराबाहेर काढायला निघालेला असताना त्यांनाच मदतीची भिक मागतो. ज्यांचे पैसे उसने घेतले त्यांचे आपण द्यावेत अशी विनंती करतो.

अभिजित राजे सोहमला विचारतात की तु नेमकं किती जणांना कडून पैसे घेतले होते. तेव्हा सोहम त्यांना लिस्ट देतो. अभिजित राजे सकरात्मक रित्या ती लिस्ट पाहतात. अजूनही ते मदत करणार हे लक्षात येत नाही. आणि इथेच कालचा एपिसोड संपला होता.

Advertisement

आजच्या भागात सुरुवातीला असं दिसून येतं की अभिजित राजे सोहमला मदत करणार असतात. ते सुलभा काकूला तिचे पैसे सगळ्यांसमोर देऊ लागतात. पण सुलभा काकू पैसे न घेताच बोलतात की हे पैसे घ्यायला मला आनंद वाटला असता जेव्हा आपल्या सोह्मचा बिझनेस चांगला चालला असता. त्याला मोठं यश मिळालं असतं. पण असं काही घडलं नाही.

See also  'लागीर झालं जी' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला को'रो'ना म्हणाली, 'मनात भीती...

त्यामुळे मला आता हे पैसे घेऊ वाटत नाहीत. सोहम बाळा एक सांगू का तू खरच खूप नशीबवान आहेस. कारण शुभ्रा सारखी चांगली बायको, आसावरी सारखी प्रेमळ आई आणि अभिजित राजे सारखे नेहमी खंबीर असणारे वडील लाभलेले आहेत. तू खरच भाग्यवान आहेस. तेव्हा अभिजित राजे म्हणतात की सगळं खरं आहे पण तुम्ही हे पैसे घ्या.

Advertisement

पैसे देऊन सोहम आणि अभिजित राजे जेव्हा सुलभा काकूंच्या घराबाहेर येतात. तेव्हा अभिजित राजे सोहमला पुढे जायला सांगतात. मला एक काम आहे मी येतो मागून. असं सांगून ते घरगडी असलेल्या पोराकडे जातात आणि सोहम घरी जातो.

त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला तीन महिन्याचा पगार देऊन अभिजित राजे म्हणतात की तू खरच खूप चांगला कुक आहेस. जा. आपल्या गावाकडे जा खुशालीने रहा. एखादं हॉटेल चालू कर म्हणजे मस्त चालेल. काळजी घे. आणि हा गावाकडे गेल्यावर आई वडिलांची सेवा कर. तो पोरगा अभिजित राजे यांच्या पाया पडून तिथून निघून जातो.

See also  "अग्गंबाई सासूबाई" मालिका सोडल्यानंतर बबड्या आता करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल!
Advertisement

सोहम आणि अभिजित राजे सोसायटीच्या लोकांनी घेऊन गेलेले सामान त्यांचे पैसे परत करून आणतात. तेव्हा घरी आल्यानंतर सोहम आईला म्हणतो की आई, बघ मी सगळे पैसे त्यांच्या तोंडावर फेकून आलो. आपलं सगळं सामान आणलं आहे बघ. पण आसावरी काम करत राहते. काहीच बोलत नाही.

अग त्यांना दम नाही निघाला नाहीतर दिले असते त्यांना त्यांचे पैसे डबल करून. आसावरी काही बोलत नाही कारण तिनेच तिच्या विश्वासावर बिल्डींग मधल्या बायकांकडून पैसे आणलेले असतात. कारण आईची माया शेवटी तिला वाटलं पोराचा बिझनेस चालेल चांगला. पण तो तर पुर्ण फसला. सोहम असावरीच्या मागे जाऊन तिला सांगतो की कंपनी बंद पडेल. हे असं होईल.

See also  'तारक मेहता...' मधील बबिताजीने केला आहे खूपच बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

पण आता केलं ना सगळं ठीक. तेव्हा आसावरी त्याला रागात सांगते की हे तू नाही तर तुझ्या बापाने दिले आहेत. तू सोहम त्या बायकांची लायकी काढतो. पण तुझी काय लायकी आहे रे ? तू तर तुझ्या बापाला घराबाहेर काढायला लागलास. सोहम तू माझा आता बबड्या नाहीस फक्त सोहम आहे. आसावरी रागात निघून जाते. खाली अभिजित राजेंना सांगते की तुम्ही त्याचे पैसे भरले का नाही सांगितलं ? तेव्हा अभिजित राजे म्हणतात की तुही बिल्डींग मध्ये पैसे मागितले हे नाही सांगितले.

आसावरी शुभ्रा आणि अभिजित राजेंची माफी मागते. मग किचन मध्ये जाते. पण तिथेही सोहम येतो आणि आई अशी हाक मारतो. पण आसावरी काहीच न बोलता निघून जाते. तेव्हा सोहम म्हणतो की अभिजित राजेंनी आणि शुभ्राने कान भरले वाटतं आईचे. पण मीही तिचा बबड्या आहे. आणि इथेच आजचा भाग संपतो.

Advertisement

Leave a Comment

close