सोहम आणि आसावरी या मायलेकांमध्ये नेमकं कोण पाडतयं फुट? अभिजित राजे, शुभ्रा की तिसरीच कोणीतरी!
.
झी मराठी वाहिनीवर सध्या चालू असलेली “ अग्ग बाई सासूबाई ” ही मालिका दिवसेंदिवस चांगलाच रंग घेताना दिसत आहे. प्रत्येक भागाला मिळणारा नवा मोड रसिकांच्या पसंतीस पडत आहे. कालच्या भागात शेवटी आसावरी सोहमवर खूप रागावलेली असते. त्यामुळे ती सोहमशी बोलायचं बंद करते.
आजच्या भागात अभिजित राजे आणि शुभ्रा हॉल मध्ये बसलेले असतात. आसावरी दोघांना चहा घेऊन येते. चहा पिताना ते तिघेही गप्पा मारत असतात. तेवढ्यात सोहम तिथे येऊन बसतो. व आईला म्हणतो की आई मला चहा दे. त्यावर आसावरी काहीच बोलत नाही; पण शुभ्रा बोलते. ती म्हणते की समोर आहे घे.
तेव्हा सोहम चहा घेतो. त्याला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो की हा चहा थंड झालेला आहे. असा कसं पिऊ मी ? तेव्हा आसावरी च्या बदल्यात शुभ्रा त्याला रागवून म्हणते की थंड झालाय तर गरम करून घे. आणि तिथून निघून जाते. आसावरी ही तिघांचे कप घेऊन किचन मध्ये धुते. त्त्यावेळी सोहम आसावरीच्या मागे येतो.
तिला चहा गरम करून दे असं सांगतो. पण आसावरी त्याला चहा गरम करायला लागणाऱ्या गोष्टी त्याच्यासमोर ठेवते. पण बोलत मात्र काहीच नाही. दुसरं काम करण्यासाठी आसावरी बाहेर निघून जाते. इकडं किचन मध्ये सोहम खूप संतापतो. आपली आई आपल्याशी अशी का वागतेय ? नक्कीच दोघांनी कान भरलेले दिसतात. या विचारात असतो.
दुसरीकडे आसावरी आणि शुभ्रा बाल्कनीमध्ये कपडे वाळवत घालत असते. तेव्हा सोहम आवाज देतो की आई टॉवेल दे. दोघी त्याचं बोलणं ऐकूण ही बोलत नाही. तेव्हा सोहम येऊन आईला म्हणतो की तू मौनव्रत धरले आहेस का ? माझ्याशी बोलत का नाहीस ? आसावरीच्या तोंडून एक शब्द ही निघत नाही.
तेवढयात अभिजित राजे तिथे येतात. त्यांनी बाजारातून भाजीपाला आणलेला असतो. तेव्हा ते बाहेर किचन मध्ये जायचं आहे जिथे ते शेफ म्हणून काम करून शो करत असतात. तेव्हा शुभ्रा म्हणते की मी तिथेच येईल त्यावर अभिजित राजे म्हणतात की मग आपण तिघे तिकडेच जेवण करू.
आसावरी म्हणते की चालेल. शुभ्रा ऑफिस ला जाते. आसावरी आणि अभिजित राजे बाहेर जातात. सोहम माझ्या जेवणाचं काय असं म्हणतो त्यावर जाताने शुभ्रा बोलून जाते की फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. यावर सोहम खूप संतापतो.
तिकडे अभिजित राजे जेवण बनवून आसावरीला खाऊ घालतात. तिला कसं झालं हे विचारतात. असावरीला जेवण आवडतं. इकडं किचन मध्ये सोहम बिस्कीट खात बसलेला आहे. तेवढ्यात प्रज्ञा सोहमला म्यागी घेऊन येते. त्यावर सोहम तिला म्हणतो की तूला पण माझी काही काळजी नाही आहे. त्यावर प्रज्ञा म्हणते की अरे आहे रे.
पण शुभ्रा समोर जर मी तुझी एवढी काळजी घेतली तर शंका येईल ना आपल्या नात्यावर. प्रज्ञा त्याला आसावरी आणि शुभ्रा बाबत उगाच जे नाही ते गोष्टी बोलून जाते. ती म्हणते की मी त्या दिवशी जे वागले त्याबद्दल सॉरी बरका. हे कोरडे बिस्कीट खायला तू काय कुत्रायेस काय? तुझी आई आता खूप बदलली आहे. ती आता तुझी आई राहिलेली नाही. असं बोलल्यावर सोहमला फार राग येतो. आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली असतानाच एपिसोड संपतो.