सोहम खेळतोय आसावरी, शुभ्रा आणि अभिजितराजेंच्या विरोधात ही नवीन चाल !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

झी मराठी वाहिनीवर सध्या ‘ अग्ग बाई सासूबाई ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. कालच्या भागात कुणीच सोहमशी नीट बोलत नव्हतं. त्याला घरी एकटं ठेऊन सगळे बाहेर जेवले होते. याचा सोहमला फार राग आला होता. त्यात प्रज्ञा ने त्याच्या रागात अजून तेल ओतलं.

आजच्या भागात अभिजित राजे दाढी करत असतात. तेव्हा तिथे आसावरी आंघोळ करून डोक्याला टॉवेल बांधून येते व म्हणते की आवरा बरं लवकर आज आपला किचन चा पहिला दिवस आहे. तेवढ्यात त्यांना घंटीचा आवाज ऐकू येतो.

आसावरी आणि अभिजित राजे देवघरात येतात तेव्हा त्यांना दिसतं की सोहम देवाची घंटी वाजवून पूजा करतोय. हे पाहून त्यांना आज असं अचानक सोहम मध्ये एवढा बदल कसा झाला हे कळत नाही. पूजा झाल्यावर तो अभिजित राजे आणि आसावरीच्या पाया पडतो.

See also  बापाला घराबाहेर काढणाऱ्या मुलावरचं आली पळून जायची वेळ! बाप बनून अभिजित राजे जातील का मुलगा सोह्मच्या मदतीला?

दोघेही त्याला आनंदाने आशिर्वाद देतात. उठून उभा राहून अभिजित राजेंना म्हणतो की तुमचा आज अभी किचन चा पहिला दिवस आहे. त्यामुळे मीही देवपूजा केली आहे. आणि इथून पुढेही मीच पूजा करेल. त्यानंतर सोहम आई आसावरीला म्हणतो की याआधी माझ्याकडून फार चुका झाल्या. पण आता इथून पुढे मी चूक करणार नाही.

त्याचं बदललेलं रूप पाहून आसावरी आश्चर्यचकित होते. त्यानंतर सोहम अभिजित राजेंना आजच्या अभी किचन शोच्या पहिल्या दिवसासाठी शुभेच्या देतो. तेव्हा तिथून तयार व्हायला अभिजित राजे आणि आसावरी निघून जातात. त्यावेळी आवरून आसावरी आणि अभिजित राजे अभी किचन कडे जाणार तेवढ्यात सोहम तिथे येतो आणि म्हणतो की सर आज तुमचा महत्वाचा दिवस आहे.

आपण आज माझा सेंट मारला तर मला छान वाटेल. असं बोलून बाटली तिथे ठेऊन तो निघून जातो. तो गेल्यावर अभिजित राजे असावरीला म्हणतात की मला ताप भरलाय का ? असं म्हणून दोघेही सेंटच्या बाटलीकडे बघत खूप वेळ हसतात. हसत हसत आसावरी अभिजित राजेंना म्हणते की तुमच्या बाबतीत सोहमचं मत बदललं आहे आता. तेव्हा अभिजित राजे म्हणतात की आपण त्याला अजून वेळ देऊ.

See also  'तू सौभाग्यवती हो' मधील ऐश्वर्या आहे या प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

दुसरीकडे शुभ्रा तिचं आवरत असते. त्याचं वेळी सोहम तिथे येतो. तिला मंगळसूत्र घालायला मदत करतो. त्यानंतर सोहम शुभ्राचा हात पकडून माफी मागतो. म्हणतो की मी खूप चूकलो आहे. तुला त्याचा खूप त्रास झाला. मला माफ कर शुभ्रा. तेव्हा शुभ्रा म्हणते की तू इथून पुढे कधी माझ्यावर संशय घेऊ नको. तरच माझ्याशी बोल.

आपलं एकमेकांशी खूप प्रेम आहे. अरे पण प्रेमाला विश्वास लागतो. जो आपण गमावला होता. तू तयार असशील तर तो आता आपण परत मिळवू. तेव्हा सोहम तिला सांगतो की आता प्रेमाला तडा जाऊन देणार नाही. तू बिनधास्त प्रेम कर माझ्यावर. मीही करतो तुझ्यावर.

नंतर अभी किचन ची सगळी तयारी उरकते. नव्याने उद्घाटन करतात. आलेले सगळे ग्राहकांना आसावरी ऑर्डर विचारते. त्यानंतर अभिजित राजे आणि आसावरी बोलतात की आज ह्या आनंदाचा दिवस पाहायला बाबा हवे होते. तेवढ्यात सोहम आणि शुभ्रा तिथे येतात.

See also  'देवमाणूस' मालिकेतील टोण्या खऱ्या आयुष्यात आहे असा, त्याचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

तेव्हा सोहम मनात म्हणतो की या अभिजित राजेंना नक्कीच वेड लागलेले दिसतय .आणि ते दोघे एका टेबलावर येऊन बसतात. गप्पा मारतात. हे सगळं आसावरी आणि अभिजित राजे पाहत असतात. तेव्हा आसावरी म्हणते की त्यांना दोघांना असं आनंदाने सोबत पाहिलं वाटतं जाऊन मिठीत घ्यावं. आणि भाग इथेच संपतो.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment