ऐश्वर्या रायची वाहिनी दिसते खूपच सुंदर, सौंदर्याबाबत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट’क्कर!
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही विश्वसुंदरी या नावाने प्रचलित आहे. तिच्या सौंदर्याची चर्चा तर संपूर्ण जगभरात केली जाते. इतकचं नव्हे तर ऐश्वर्या जिथे कुठे जाते, तिथे ती आपल्या मोहक सौंदर्याने सगळ्यांना घा’या’ळ करते. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही चित्रपटांत कमी दिसत असली, तरीही ती ब्यूटी विथ ब्रे’न क्वीन म्हणूनच जगभरात प्रसिद्ध आहे.
बॉलीवुडच्या बच्चन परिवारातील ही खानदानी सून ऐश्वर्या बच्चन. हिच्या समोर तर मोठमोठ्या अभिनेत्री पण अगदीच फिक्या प’ड’ता’त. तिच्या सौंदर्याची सर तर इतर अभिनेत्रींना कधीच येणार नाही. मात्र तुम्हांला माहित आहे का, ऐश्वर्याची वहिनी मात्र सौंदर्याच्या बाबतीत तिला अक्षरशः खूप मागे टाकते. हो..अगदी बरोबर ऐकत आहात तुम्ही.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी श्रीमा राय. तुम्ही- आम्ही सर्वजण ऐश्वर्या च्या सासरच्या लोकांना तर खूपच चांगले ओळखतो. पण ऐश्वर्या च्या माहेरच्या लोकांना आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहिती नाही.
अगदी त्याचप्रमाणे ऐश्वर्या च्या वहिनी बद्दल देखील खूपच कमी लोकांना माहित असेल. तर आम्ही आज तुम्हांला या दोघी नणंद- भावजयांच्या सौंदर्याबद्धल तुम्हांला सांगणार आहोत.
अभिनेत्री ऐश्वर्या राय चा भाऊ आदित्य रॉय. तो मर्चंट नेवी मध्ये इंजिनीयर पदावर काम करत होता. त्याची पत्नी आणि ऐश्वर्याची वहिनी श्रीमा रॉय ही अतिशय सुंदर बो’ल्ड लुकिंग दिसते. ती भले चित्रपटांत काम करत नसली तरीही तिने स्वतःला एका मॉडेल अभिनेत्री प्रमाणेच मेन्टेन केले आहे. यासाठी तुम्ही श्रीमा चे इन्स्टाग्राम अकाउंट पाहू शकता.
मंगळूर मध्ये राहणारी श्रीमा सध्या आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहते. ती एक फॅशन ब्लॉगर तर आहेच, पण त्याचसोबत ती एक होममेकर पण आहे. 2009 मध्ये श्रीमा मिस इंडिया कॉन्टेस्ट मध्ये सहभागी झाली होती.
>
तर या कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट रनर अप होती. तिने आपल्या करियरच्या सुरूवातीला तर मॉडेलिंग सुद्धा केले आहे. त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या आणि तिची वहिनी श्रीमा या दोघींनाही मॉडेलिंगची संपूर्ण माहिती असल्याने त्या दोघींचेही एकमेकींसोबत खूप छान जमते.
काही दिवसांपूर्वीच श्रीमा ला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या एका फॅनने विचारले होते की, “तुम्ही तुमच्या मुलांना तुमची आत्या एवढी फेमस आहे, हे कसे बरं सांगता?” तर यावर श्रीमा ने म्हटले की, “ऐश्वर्याला आमच्या घरातील मुले ‘गुलु’ आत्या अशी हाक देतात.”
तुम्हांला माहित आहे का, या दोघी नणंद- भावजय एकमेकांसोबत मॉडेलिंगच्या आणि रॅम्प च्या टीप्स सुद्धा शेयर करतात. याचे उदाहरण म्हणजे श्रीमाने तिच्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती ऐश्वर्याला एक अभिनेत्री म्हणून नाही तर आधी एक नणंद आणि मग खूप छान जवळची मैत्रीण म्हणून पसंद करते.
सध्या श्रीमा रॉय ही मॉडेलिंग पासून दूर असून ती आपल्या मुलांना आणि कुटुंबाला सांभाळत आहे. तर तिला दोन मुलगे आहेत. ज्यांची नावे विहान आणि शिवांश अशी आहेत. श्रीमा आणि आदित्य चे लवमॅरेज झालेले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.