अजय-अतुल यांचे घर आहे खूपच आलिशान, घराचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर ज्यांच्या आवाजाची जादू आहे, अशी जोङी म्हणजे संगीतकार अजय- अतुल गोगावले. त्यामुळे त्यांचे फॅन्स आपल्या या लाडक्या जोङी विषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अजय- अतुल यांच्याविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नात एक खास घर असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण अतिशय मेहनत घेतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या खूप वेगवेगळ्या असतात. त्याच दृष्टीने आपल्या स्वप्नातील घराच्या कल्पना या देखील सर्वांच्या वेगवेगळ्या असतात. त्याप्रमाणे आपलं स्वप्नातील घर सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र याला कलाकार मंडळी सुद्धा अपवाद नसतात.

See also  सोशल मीडियावर भडकल्या 'तुझ्यात जीव रंगला' मधील वहिणी साहेब, कारण ऐकून थक्क व्हाल!

कारण विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलीवुड कलाकार असो किंवा मराठी कलाकार. त्यांच्या घराच्या आतमधील आणि घराच्या बाहेरील फोटोज् हे बहुतांश वेळा समोर आलेले आहेत. अजय अतुल यांच्या देखील घरातील फोटोज् असेच सोशल मीडियावर वायरल होत असतात.

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अजय- अतुल यांनी सिनेसृष्टीत अत्यंत मेहनतीने स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अजय व अतुल या दोन्ही भावांनी आज पुण्यात एक भव्यदिव्य आशियाना उभा केला आहे. पुण्यातील बाणेर मध्ये अजय- अतुल यांचे घर आहे.

तीन मोठमोठे बेडरूम, लिविंग एरिया, किचन तसेच एक स्टुडिओ सुद्धा त्यांनी आपल्या घरात बनवून घेतला आहे. या घराचे इंटेरियर सुद्धा अतिशय खास पद्धतीने ङिजाइन करण्यात आले आहे. सचिन खाटपे यांनी अजय अतुल यांच्या घराचे संपूर्ण इंटेरियर ङिजाइन केले आहे. तर अजय- अतुल यांच्या घरातील आतील फोटोज् हे फोटोग्राफर प्रशांत भट यांनी क्लिक केले आहेत.

See also  फँड्री फेम अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुड पदार्पण, तिच्या चित्रपटाचे नाव देखील आले समोर...

आता सोशल मीडियावर बॉलीवुड किंग शाहरुख खान, सलमान खान यांप्रमाणेच अजय- अतुल यांच्या देखील घराच्या फोटोंना प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे. थोडक्यात म्हणजे घराचा प्रत्येक कोपरा आणि कोपरा सजविण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली असल्याचे दिसते. त्यामुळे स्वर्गाहूनही सुंदर असे हे अजय- अतुल गोगावले यांचे घर आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment