पूरग्रस्तांना पॅकेजसाठी अजूनही वाट पहावी लागणार, अजित पवारांनी केले स्पष्ट, जाणून घ्या कधी मिळेल पॅकेज?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोल्हापूर: राज्यात अतिवृष्टी होऊन एक आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. अतिवृष्टीमूळे नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी जीवित वित्त हानी झाली. यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागलं. हजारो लोक बेघर झाले असून हजारो पाळीव प्राणी सुद्धा मृत झाले.  मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते अनेक सत्ताधारी मंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मात्र, राज्य सरकारने अजूनही पुरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलेले नाही. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले असून, जोपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत याबाबत स्पष्ट निर्णय घेता येणार नाही.

जनतेला केले मदतीचे आवाहन…

See also  राजकारणात नसते तर ‘तिथे’ असते राज ठाकरे; वाचा, स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलेली माहिती

अजित पवार यांच्या भाष्यानंतर पूरग्रस्तांना अजून काही दिवस वाटच पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज ते कोल्हापूर दौर्‍यावर होते. पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जोपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत मुख्य  पॅकेज जाहीर करता येत नाही, सध्या तातडीची मदत सुरूच आहे. सरकार सोबतच राज्यातील जनतेनेही मदतीसाठी पुढे यावे आणि दानशूरांनी सढळ हाताने मदत करावी, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

राज्यापालाविषयी बोलणे टाळले…

सध्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे निलंबित आमदार आशीष शेलारही आहेत. याबाबत अजित पवार यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. राज्यपालांनी कोणाला सोबत घेऊन जावं हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर काही बोलणार नाही, असं ते म्हणाले.

See also  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची काळजी घेणारे आहेत तरी कोण निलेश लंके कोण? ​जाणून घ्या त्यांची जीवनगाथा..

राज्यातील पूरपरिस्थितीची आम्ही सर्वांनी पाहणी केली असून, आज संध्याकाळी मी, जयंत पाटील आणि विश्वजीत कदम मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना परिस्थितीची माहिती देणार आहोत. तसेच मी आणि मुख्यमंत्री केंद्राशी संपर्क साधून असल्याचेही त्यांनी सांगितले.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment